Pune News : पेट्रोल पंपावर दरोड्यातील टोळीला अटक

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज : कात्रज परिसरातील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केले. त्यांच्याकडून शस्त्रे, मिरचीपूड, दोरी, बॅटरी जप्त करण्यात आली.

लिंबराज दत्तात्रय घोरपडे (वय २१), मोहसीन मोनीर शेख (वय २७), मेहबुब हुसेन शेख (वय २७), अदनान जाफर शेख (वय १९) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक दीपक मते यांनी फिर्याद दिली आहे.

भारती विद्यापीठ पोलीस पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी कात्रज परिसरातील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची टोळी  थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी दरोडा टाकणार असल्याची कबुली दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक समाधान मचाले तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.