Pune News : जामिनासाठी बनावट कागदपत्रे तयार करणारी टोळी जेरबंद

24 जणांवर गुन्हा तर 13 जण अटकेत

एमपीसी न्युज : अटकेत असलेल्या गुन्हेगारांना जामीन मिळवून देण्यासाठी बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या मोठा टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या कारवाईमुळे गुन्हेगार आणि वकिलांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाई दरम्यान पोलिसांनी 13 जणांना अटक केली आहे. तर एकूण चोवीस जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.

निलेशकुमार नंदकुमार शहाने (वय 27, मनपा शाळेजवळ, दत्तवाडी), महारुद्र मोहन मंदरे (वय 26, माणिकबाग), असिफ ताहीर शेख (वय 27, कात्रज), मोहसीन बाबू सयद (वय 48, रा. निगडी), रशिद अब्दुल सय्यद (वय 49, रा. शांतीनगर), अमीर नूरमहम्मद मुलाणी (वय 44, चिंचवड), नागेश माणिक बनसोडे (वय 39, पिंपरी), भावेश विजय शिंदे (वय 33), विक्की विद्यासागर पुडगे (वय 28), कल्पेश सीताराम इंगोले (वय 18), सोनू अशोक जगधने (वय 29), शशांक प्रकाश साळवी (वय 31), शुभम ज्ञानोबा लांडगे (वय 18) यांना अटक करण्यात आली आहे.

शिवाजीनगर, लष्कर, वडगाव यासह वेगवेगळ्या न्यायालयात चोरी, जबरी चोरी, घरफोड्या, दरोडा आणि पॉस्को सारख्या गंभीर गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपींना जामीन मिळवून देण्यासाठी बोगस कागदपत्रे तयार करून ते सादर करत असे. यामध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड, आणि सातबारा उतारे हे बनावट तयार केली जात.

ती जामिनासाठी न्यायालयात सादर केली जात. तर काही प्रकरणात जामिनावर सुटल्यानंतर तारखेला न्यायालयात हजर राहणार नाहीत, अश्याना एजंटमार्फत बोगस जमीनदार मिळवून देत. यात न्यायालयाची दिशाभूल तर होत असतच पण त्यामुळे गुन्हेगारांचे फावत होते. यामुळे पोलिसांनाच याचा त्रास सहन करावा लागत. कारण, बहुतांश हे सराईत आणि घरफोडी, चोऱ्या करणारे आरोपी असत. जे एकदा जामीन भेटला की नंतर ते कधीच न्यायालयात तर येत नसत. पोलिसांच्या देखील हाती लागत नव्हते. त्यांची गुन्हेगारी कृत्ये मात्र सुरूच राहत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.