Chakan Police Action : मोटार सायकल चोरांची टोळी जेरबंद; चाकण पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज : चाकण पोलिसांनी मोटारसायकल चोरी (Chakan Police Action) करणारी टोळी जेरबंद केली असून त्यांच्याकडून तब्बल 12 लाख 50 हजार रुपये किमतीच्या 25 चोरीच्या दुचाक्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघांवर चाकण, निगडी, शिक्रापूर आणि कोतवाली (अहमदनगर) आदी पोलीस ठाण्यांमध्ये 13 वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.

अशोक मधुकर सोनवणे (रा. राळेगण थेरपाळ ता. पारनेर जि. अहमदनगर), फारूक अन्सार पठाण (रा. चाकण ता. खेड) व योगेश प्रकाश वटांबे (रा. बालाजीनगर चाकण ता. खेड, जि. पुणे) अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे व तपास पथकास माहिती मिळाली की, रेकॉर्ड वरील गुन्हेगार अशोक सोनवणे तसेच फारूक पठाण व योगेश प्रकाश वटांबे हे मोटारसायकल चोरीसाठी साबळेवाडी व मेदनकरवाडी, चाकण परिसरात येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली.

त्यातील आरोपी अशोक सोनवणे हा भोसे, चाकण येथील चोरीची मोटारसायकल घेऊन फिरत असताना त्यास सापळा लावून तपास पथकाने ताब्यात घेतले. सदर आरोपीकडे तपास केला असता रेकॉर्डवरील आरोपी अशोक सोनवणे याने यापूर्वी वेळोवेळी चाकण पोलीस ठाणे व इतर पोलीस ठाणे (Chakan Police Action) हद्दीतून चोरी केलेल्या एकुण 19 हिरो होंडा कपंनीच्या स्प्लेन्डर व स्प्लेन्डर प्लस मोटारसायकल पोलिसांनी हस्तगत केल्या. तसेच, अटक केल्यानतंर सदर आरोपीकडे तपास केला करून आरोपी फारूक पठाण व योगेश वटांबे यांनी चाकण परिसरातून चोरलेल्या स्प्लेन्डर प्लस, टि व्ही एस अपाची आदी विविध कंपन्यांच्या 25 दुचाक्या जप्त करण्यात आल्या.

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सहा. पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल देवडे, सहा. पो. निरीक्षक प्रसन्न जराड, विक्रम गायकवाड, व सुरेश हिंगे, हनुमंत कांबळे, प्रदीप राळे, निखिल वर्पे आदींच्या पथकाने हि कारवाई केली.

दरम्यान पिंपरी चिचंवड पोलीस आयुक्तालया अतंर्गत चाकण पोलीस ठाणे हददीमध्ये मोठया प्रमाणात औदयोगिक क्षेत्र असल्याने अज्ञात व्यक्तींकडून मोटारसायकल चोरी होत होत्या. मोटारसायकल चोरीबाबतचे गुन्हे उघड करण्याच्या सुचना पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिल्या होत्या. त्यानंतर या बाबत तपास पथके तयार करून सदरची कारवाई करण्यात आल्याचे चाकणचे वरिष्ठ निरीक्षक वैभव शिंगारे यांनी सांगितले.

Mohit Kamboj : मोहित कंबोज यांच्या ट्विटमध्ये दडले काय? राष्ट्रवादीची होणार का भांडाफोड?

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.