Pune Crime : स्वारगेट परिसरात दहशत माजवणारी सराईत गुंडांची टोळी गजाआड

एमपीसी न्यूज : पुण्यातील स्वारगेट परिसरातील मीनाताई ठाकरे वसाहतीत दहशत माजवणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (Pune Crime) या ठोळीचा मोरक्या सचिन माने यांच्यासह नऊ साथीदारांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून घातक शस्त्र जप्त करण्यात आली असून या सर्वांवर संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक (मोका) कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे. 

 

सचिन परशुराम माने, विजय प्रमोद ढिखळे, अमर तानाजी जाधव, रमेश दशरथ मॅडम, अजय प्रमोद ढिखळे, रोहित मधुकर जाधव, यश किसन माने, मोन्या उर्फ सुरज सतीश काकडे, निखिल राकेश पेटकर या आरोपींना अटक केली आहे. या सर्वांवर मोका कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

Vadgaon Maval : छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सवाची उत्साहात सांगता

 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, गुन्हेगार सचिन माने आणि त्याच्या साथीदारांनी प्रतिस्पर्धी टोळीतील प्रकाश पवार आणि त्याच्या तीन साथीदारांवर कोयत्याने वार केले होते. (Pune Crime) यात तिघेजण गंभीर जखमी झाले होते. कसबा विधानसभा निवडणुकीच्या दिवशीच हा प्रकार घडला होता. पोलिसांनी त्या दिवशी चार आरोपींना अटक केली होती. मात्र इतर आरोपी पसार झाले होते. त्यानंतर या टोळीतील सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.