BNR-HDR-TOP-Mobile

Pune – ‘गंगाधर स्वरोत्सवा’चा बहारदार गायनाने समारोप

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – सहकारनगर येथील मुक्तांगण बालरंजन केंद्रात आयोजित ‘गंगाधर स्वरोत्सवा’चा समारोप कौशिकी चक्रवर्ती आणि श्रीनिवास जोशी यांच्या सुरेल गायनाने झाला.

कार्यक्रमात सुरुवातीला श्रीनिवास जोशी यांनी शुद्ध कल्याण राग आळवला. त्यातही बंदिश तर ख्याल गायकीचा अविष्कार सादर केला. खमाज रागातील ‘छब दिखलाजा बाके सांवरिया’ या ठुमरीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. शेवटी पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेल्या ‘माझे माहेर पंढरी’ या अजरामर भजनाने श्रीनिवास जोशी यांनी आपल्या गायनाची सांगता केली.

‘गंगाधर स्वरोत्सवा’चा समारोपाप्रसंगी कौशिकी चक्रवर्ती यांच्या सुरेल गायकीने गंगाधर स्वरोत्सवाला स्वर-सौंदर्याचा साज चढला. समारोपाच्या उत्तरार्धात कौशिकी यांनी गायलेल्या अभोगी रागातील ‘कैसे कहू मन की विपदा’ बंदिशीने त्यांनी श्रोत्यांना अक्षरशः खिळवून ठेवले.

याप्रसंगी स्वरनिनाद संस्थेच्या संचालिका वृषाली निसळ, ऍना कंस्ट्रक्शनचे अल्पना अर्चिस अन्नछत्रे, पीआरएम इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रीतम मंडलेचा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. तबल्यावर अजिंक्य जोशी, संवादिनीवर श्रीनिवास आचार्य, तानपुर्‍यावर संघमित्रा आणि प्रीती सोहनी यांनी साथसंगत केली. यावेळी मधुरा ओक-गद्रे यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.

HB_POST_END_FTR-A2

.