Pune : युवकांना गांजा विक्री करणा-या सराईत गुन्हेगाराला अटक

एमपीसी न्यूज – महाविद्यालयीन युवकांना गांजा विक्री करणा-या एका सराईत गुन्हेगाराला युनिट चारच्या पोलिसांनी सापळा लावून अटक केली. त्याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शौकत बाबुलाल शेख (वय 52, रा. नेताजीवाडी, शिवाजीनगर, पुणे), असे अटक केलेल्या साईत गुन्हेगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना राहुल टॉकिजजवळ फुटपाथवर एक इसम गांजा विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे पोलिसांनी सापळा लावून आरोपी शौकत याला अटक केली. त्याच्याकडून 200 ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला. तेलंगणा येथून त्याने हा गांजा आणल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.

शौकत हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही त्याच्यावर गांजा विक्री व अन्य गुन्हे दाखल आहेत. युनिट चारच्या पोलिसांनी त्याला पकडून शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्याची आणखी चौकशी सुरू असून शिवजीनगर पोलीस पुढील तपास करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.