Pune News : शक्तिप्रदर्शन नडले ! गॅंगस्टर शरद मोहोळसह पाच जण गजाआड

एमपीसी न्यूज : खुनाच्या गुन्ह्यातून येरवडा कारागृहातून निर्दोष सुटका झाल्यानंतर शहरात आपली व आपल्या गॅंगची पूर्वीप्रमाणेच दहशत राहावी यासाठी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या गॅंगस्टर शरद मोहोळ सह पाच जणांना अटक करण्यात आली. खडक पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

शरद हिरामण मोहोळ (वय 38), विश्वास बाजीराव मनेरे (वय 37), मनोज चंद्रकांत पवार (वय 42) स्वप्निल अरुण नाईक (वय 35) योगेश भालचंद्र (वय 40) या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर अक्षय भालेराव, सिताराम खाडे, दिनेश भिलारे, मंगेश धुमाळ यांच्यासह दहा ते बारा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, 26 जानेवारी रोजी खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत पतित-पावन संघटनेच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला गॅंगस्टर शरद मोहोळ आणि त्याचे दहा ते बारा साथीदार त्या ठिकाणी आले होते. Covid-19 अनुषंगाने जमाबंदी आदेश असतानाही आरोपींनी बेकायदेशीर गर्दी जमवून आरडाओरडा करत गुरुवार पेठेत दहशत निर्माण केली होती. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.