Ganpati Visarjan 2023 : दिलेल्या शब्दाचा मान राखत बऱ्याच वर्षांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे झाले विसर्जन; जाणून घ्या कारण

एमपीसी न्यूज : : दरवर्षी सर्वात उशिरा (Ganpati Visarjan 2023) होणाऱ्या पुणेकरांच्या लाडक्या म्हणजेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन या वर्षी मात्र लवकर झाले आहे. यामुळे सर्वच जण चकित झाले आहेत.  या वर्षी पावणे नऊ वाजता दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन संपन्न झाले आहे. 

पुण्यात मानाचे पाच गणपती आणि दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन झाल्याशिवाय इतर गणपतीचे विसर्जन होत नाही. वर्षानुवर्षे असलेली ही परंपरा आजतागायत पुणेकरांनी जपून ठेवली आहे.

मात्र, दरवर्षी भाविकांची संख्या वाढत चालली आहे. या मानाच्या गणपती विसर्जनाला उशीर झाल्यामुळे मागचे मंडळ, भाविक खोळंबतात त्यामुळे सामाजिक प्रश्न निर्माण होतो.

Ganpati Visarjan 2023 : इतिहासात पहिल्यांदाच दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ दुपारी विसर्जन मार्गावर मार्गस्थ

ही अडचण पाहता यंदा दिलेल्या शब्दाचा मान राखत  श्रीमंत (Ganpati Visarjan 2023) दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक चार वाजता निघून रात्री 9 च्या आधी विसर्जन करण्यात आले आहे. असे मंडळाकडून सांगण्यात आले. कालचक्र फिरते तसे बदल झाले पाहिजेत, ही बदल समाजाच्या हितासाठी असले पाहिजेत यामुळेच हा सोहळा लवकर संपन्न झाला आहे.

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share