BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : दीड ‌दिवसाच्या बाप्पांना निरोप

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज  – गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या… अशा जयघोषात आणि पारंपरिक वातावरणात पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी दीड दिवसाच्या गणरायांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. काल गुरुवारी मोठ्या आनंदाने व उत्साहाचे घरोघरी आगमन झाले होते. मात्र, अनेकांच्या घरी परंपरेनुसार दीड दिवसातच बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.

दुपारी तीन नंतर सहकुटुंब विसर्जनाला सुरुवात झाली. यावेळी कुटुंबियांनी बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. गणरायांची काल चतुर्थीच्या मुहूर्तावर स्थापना करण्यात आली होती. कालचा पूर्ण दिवस आणि आज दुपारपर्यंत असा दीड दिवस असतो. त्यानुसार आज दुपारी तीननंतर अनेकांनी विसर्जनाची तयारी केली. त्यानंतर श्री गणेशाची विधिवत पूजा, आरती करून व नैवेद्य दाखवून तलावावर व नदीच्या ठिकाणी विसर्जनास सुरुवात केली. पिंपरी-चिंचवडसह पुणे शहरात दीड दिवसाचा गणपती मोठ्या प्रमाणात असतो. सायंकाळपासून सुरु झालेले विसर्जन रात्री उशीरापर्यंत सुरू राहते.

HB_POST_END_FTR-A4

.