Pimpri News : गरीब श्रीमंतातील दरी चिंताजनक – काशिनाथ नखाते

एमपीसी न्यूज –  भारतातील केवळ 1 टक्के अब्जाधीशांच्या  ताब्यात देशातील 40 % संपत्ती आहे. भारतातील अब्जाधीशांच्या संपत्तीत 121 %  प्रमाणे दररोज 3608 कोटी रुपयांची भर पडत आहे. तळाच्या 50 % गरीब लोकसंख्येच्या ताब्यात फक्त 3 % संपत्ती आहे. (Pimpri News) ही ऑक्सफॅमच्या अहवालातून स्पष्ट होत असलेली गरीब – श्रीमंतीची दरी फार मोठी असून गरीब गरीबच होत आहे. तर, श्रीमंत श्रीमंतच होत असून दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे खोटे आश्वासन देऊन रोजगार व लघु उद्योग वाढीस केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरलेले असून या बेरोजगारीला कारणीभूत केंद्र सरकार  असल्याची टीका कष्टकरी कामगार संघाचे नेते काशिनाथ नखाते यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष , कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे दिलेल्या  प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीत पहिल्याच दिवशी ऑक्सफॅम इंटरनॅशनलने वार्षिक विषमता अहवाल सादर केला.  त्यामध्ये भारतातील स्थितीबाबत एक स्वतंत्र पुरवणी मांडण्यात आली. भारतामध्ये अब्जाधीशांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत असून 2020 मध्ये ही संख्या 102 होती. तर ती वाढून 2022 मध्ये 166 वर गेल्याचे दिसून आले. देशातील 100 श्रीमंत भारतीयांची एकत्रित संपत्ती केल्यास 54.12 लाख कोटी रुपये एवढे असून ती देशाच्या 18 महिन्याच्या केंद्रीय अर्थसंकल्पा एवढी आहे हे भयानक वास्तव बदलण्याची गरज असून यावर्षीच्या प्रारंभीच 24 हजार नोकरदारांना आपली नोकरी गमवावी लागली.

Pune News : ‘माध्यमांसमोर पक्षाचे जाहीर धिंडवडे काढणाऱ्यांवर’ काँग्रेस पक्षाध्यक्षांनी प्रथम कारवाई करावी – गोपाळ तिवारी

ॲमेझॉन, मेटा ,ट्विटर ,गुगल, ओरॅकल ,उबेर ,ओला ,स्कीट अशा अनेक कंपन्यांनी नोकर कपात सुरू केलेले असून ही कपात रोखण्यासाठी व नवीन नोकऱ्या देण्यासाठी  मन की बात करणारे मोदी सरकार अपयशी ठरले.  दरवर्षी दोन कोटी रोजगाराचे स्वप्न हे खोटे ठरले. (Pimpri News)  त्याउलट बेरोजगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. कष्टकरी कामगारांना किमान आणि समान वेतनही मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये कामगार कायद्यातील  केलेले बदल आणि आणलेल्या नवीन श्रम संहिता याचा कंपन्या ,कारखानदार फायदा घेऊन दर दिवस कामगारावरती अन्याय अत्याचार करत आहेत. सरकारचे कामगार विरोधी धोरण याला जबाबदार असून केंद्र सरकारने योग्य पावले न उचलण्यास तरुणांचा देश हा बेरोजगाराचा देश होण्यास वेळ लागणार नाही अशी भितीही नखाते यांनी व्यक्त केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.