Pimpri News : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कचरावेचक कामगाराने केला आईचा खून, मुलाला अटक

एमपीसी न्यूज कामावर जा दारु पिऊ नको असे म्हणत आई ओरडली याचा राग मनात धरून मुलाने चक्क आईच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून केला आहे. (Pimpri News) हि घटना पिंपरीतील भाटनगर परिसरातील निराधरानगर येथे 9 मार्च रोजी घडली. आरोपीला अटक केली असून तो पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कचरा गाडीवर कामगार म्हणून काम करत होता.

 

प्रयागबाई अशोक शिंदे (वय 58) असे मयत आईचे नाव असून विश्वास अशोक शिंदे (वय 30 रा. नाराधारनगर, पिंपरी) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकऱणी बुधवारी (दि.22) पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पिंपरी-चिंचवड माहापालिकेत कचरा गाडीवर कामाला आहे. मात्र त्याला दारुचे व्यसन असल्याने 9 मार्च रोजी सकाळी आटच्या सुमारासच तो कामावर न जाता दारु पिऊन घरात पडला होता. यावेळी आई कामावर जात नाही म्हणून ओरडली. (Pimpri News) याचा राग येवून विश्वास हा घराबाहेर गेला व त्याने सिंमेटचा गट्टू थेट आईच्या डोक्यात घातला. यावेळी रक्तबंबाळ झालेले डोके घेऊन आई घराबाहेर जीव वाचवण्यासाठी आरडा-ओरड करत गल्लीत पळत असताना विश्वास पुन्हा तिला मारण्यासाठी तिचा पाठलाग करत होता.

 

Pune Crime : पुण्यात भर दिवसा कोयत्याचा धाक दाखवून लुटले तब्बल 47 लाख

 

यावेळी प्रयागबाई खाली पडल्या. आरडा-ओरड ऐकून लोक जमा झाले. विश्वास मात्र घाबरून तिथून निघून गेला. गल्लीतल्या शेजाऱ्यांना विश्वास दारु पिऊन भांडतो हे माहिती होते.(Pimpri News) त्याच्यापासून पळताना प्रयागबाई पाय घसरून पडली त्यामुळे तिला लागले असा समाज शेजाऱ्यांचा झाला. यावेळी प्रयागबाई च्या मुलीला याबाबत सांगण्यात आले. मुलीने आईला तळेगाव दाभाडे येथे उपचारासाठी दाखल केले.

 

हा सारा प्रकार गुन्हे शाखा दोन पथकाचे सहायक फौजदार शिवानंद स्वामी यांना त्यांच्या बातमीदारामार्फत कळाले की, मुलाने आईला गंभीर मारहाण केली असून त्यात आईचा मृत्यू झाला आहे. (Pimpri News) त्यानुसार पोलिसांनी सखोल तपास केला. यावेळी आईच्या मृत्यूनंतर विश्वास हा पळून जाण्याच्या तयारीत होता. यावरून पोलिसांनी सापळा रचून विश्वासला अटक केली.याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

हि कारवाई गुन्हे शाखा दोनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, पोलीस अंमलदार शिवानंद स्वामी, दिलीप चौधरी, आतिश कुडके, अजित सानप, शिवाजी मुंढे, उद्धव खेडकर यांनी केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.