Pimpri: दोन महिन्यांपासून बंद असलेली उद्याने, क्रीडांगणे, जलतरण तलाव यापुढेही बंदच राहणार

gardens, playgrounds, swimming tanks to remain closed in lockdown 4.0 in Pimpri Chinchwad

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने उद्याने, क्रीडांगणे, जलतरण तलाव बंद ठेवून दोन महिने झाले आहेत. शहरात कोरोनाचा कहर सुरुच आहे. त्यामुळे लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यातही जलतरण तलाव, क्रीडांगणे बंदच राहणार असल्याचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले आहे.

कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातही कोरोनाच्या रुग्णांने दोनशेचा आकडा पार केला आहे. रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. शहरातील रुग्ण संख्या वाढत असलेला भाग प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) घोषित केला जात आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी दोन महिन्यांपासून नागरिक घरी आहेत. आजपासून चौथा लॉकडाउन सुरु झाला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने 14 मार्चपासून शहरातील उद्याने, क्रीडांगणे, जलतरण तलाव, अभ्यासिका,  सार्वजनिक वाचनालये बंद ठेवली आहेत. त्याला दोन महिने पुर्ण झाली आहेत. यामुळे यंदा बच्चेकंपनीला ना पोहण्याचा ना,  उद्यानात फिरण्याचा आनंद घेता आला.  महापालिकेची शहरात विविध 105 उद्याने तर 12 जलतरण तलावे आहेत.

शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. त्यामुळे जोपर्यंत कोरोना आटोक्यात येत नाही.  तोपर्यंत उद्याने, जलतरण तलाव, क्रीडांगणे चालू केली जाणार नाहीत. चौथ्या लॉकडाउनमध्येही जलतरण तलाव, क्रीडांगणे बंदच राहणार असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.