_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Sangvi : घरातून भर दिवसा सिलेंडर टाकी आणि सोन्याचे दागिने चोरीला

Gas cylinder and gold jewellery stolen during daytime from old Sangvi area.

एमपीसी न्यूज – भर दिवसा अज्ञात चोरट्यांनी घरातून सिलेंडरची टाकी आणि सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना 26 जुलै रोजी दुपारी 12 ते एक वाजण्याच्या सुमारास शितोळे चाळ, प्रियदर्शनी नगर, जुनी सांगवी येथे घडली.

सुरज राजेश शर्मा (वय 18, रा. शितोळे चाळ, प्रियदर्शनी नगर, जुनी सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरज शितोळे चाळ, प्रियदर्शनी नगर, जुनी सांगवी येथे राहतात.

_MPC_DIR_MPU_II

ते रविवारी दुपारी बारा वाजता घराच्या बाहेर असलेल्या नळावर कपडे धुण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचे घर कडी लाऊन बंद होते.

अज्ञात चोरट्यांनी घर उघडून घरातून सिलेंडरची टाकी आणि सोन्याचे दागिने असा एकूण 16 हजारांचा ऐवज चोरून नेला. दुपारी एक वाजता कपडे धुवून घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला.

त्यानंतर त्यांनी खात्री करून बुधवारी (दि. 29) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.