Bhosari : उज्वला गॅस योजनेअंतर्गत गरजू महिलांना गॅस वाटप

स्वीकृत सदस्य पांडुरंग भालेकर यांचा उपक्रम 

एमपीसी न्यूज –  आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड फ विभागाचे स्वीकृत सदस्य पांडरुंग भालेकर आणि शहीद शंकर गॅस एजन्सी यांच्या संयुक्त विद्यमाने गरीब व गरजू महिलांना मोफत गॅस वितरण कऱण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत गरीब व महिलांना गॅस देण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. यावेळी तळवडे गावच्या विकासाचा प्रारंभ करणारे गावचे माजी सरपंच, उपसरंपच व ग्राम पंचायत सदस्य तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर राहुल जाधव यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम पांडुरंग भालेकर युवा प्रतिष्ठानच्यावतीने दक्षता मित्र मंडळ तळवडे येथे पार पडला.

यावेळी मोफत गॅस वितरण कार्यक्रमात सुमारे 100 महिलांना मोफत गॅसचे वाटप करण्यात आले.  कार्यक्रमाला भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, माजी नगरसेवक शांताराम भालेकर, सुरेश म्हेत्रे, अरुणा भालेकर, गणपत भालेकर, विठ्ठल भालेकर, ग्रा. सदस्य बाळासाहेब वाळुंज, वामन भालेकर, शांताराम भालेकर, शांताराम भालेकर, धोंडिबा भालेकर, डी. भालेकर, कमळाबाई भालेकर, शकुंतला भालेकर, रंजना चव्हाण तसेच हभप  रंगनाथ भालेकर, रुपीनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक रमेश भालेकर, काळुराम भालेकर, शकुंतला भालेकर, रंजना चव्हाण तसेच सुहास ताम्हाणे, किरण पाटील, बाळासाहेब म्हेत्रे. सोमनाथ मेमाणे, शंकर काळभोर, दादा सातपुते, विजय थिटे, शिवाजी चव्हाण, रामदास गवारे, तळवटडे-रुपीनगर ग्रामस्थ व पांडुरंग भालेकर  मित्र परिवार उपस्थित होता. तसेच कार्यक्रमाला शहीद शंकर गॅस एजन्सीचे दीपक डोके व विनोद नवले आणि त्यांच्या पूर्ण संस्थेचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजित भालेकर यांनी केले. तर आभार पांडुरंग भालेकर यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.