Sangvi News : खोदकाम करताना गॅस पाईपलाईन लिक

एमपीसी न्यूज – जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम करत असताना रस्त्याच्या बाजूला असलेली गॅस लाईपलाईन लिक झाली. ही घटना मंगळवारी (दि. 14) सायंकाळी कृष्णा चौक, पिंपळे गुरव येथे घडली.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा चौकात लेन नंबर तीन येथे जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम केले जात होते, त्यावेळी एमएनजीएलची भूमिगत गॅस पाईपलाईन लिक झाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पिंपरी चिंचवड अग्निशमन विभागाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. शिवाय, एमएनजीएल कंट्रोलचे एक पथक देखील दाखल झाले.

गॅस पाईपलाईन लिक झाल्याने गॅस परिसरात पसरला होता. परंतु, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन काहीच वेळात गॅस पाईपलाईन दुरुस्त करण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.