Talegaon : सरस्वती विद्या मंदिर शाळेचा ‘पंचतारांकित हरित शाळा’ पुरस्काराने गौरव

एमपीसी न्यूज – सामाजिक वनीकरण विभाग,पुणे जिल्हा आणि जिल्हा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा ‘पंचतारांकित हरित शाळा पुरस्कार’ यावर्षी तळेगाव दाभाडे येथील सरस्वती विद्या मंदिर या शाळेला देण्यात आला. हा पुरस्कार मिळण्याचे शाळेचे हे चौथे वर्ष आहे. सलग चौथ्या वर्षी पंचतारांकित हरित शाळा पुरस्कार मिळाल्याने सर्वत्र शाळेचे कौतुक होत आहे. पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन शाळेला सन्मानित करण्यात आले.

हरितसेना प्रमुख संजय गायकवाड, मुख्याध्यापिका रेखा परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील हरीत सेनेतर्फे वर्षभर पर्यावरण विषयक उपक्रम सक्रियपणे राबविण्यात येतात. यामध्ये शाळेतील सर्व शिक्षक आणि कर्मचारी सक्रिय सहकार्य करतात. संजय गायकवाड व विद्यार्थ्यांनी पुरस्कार स्वीकारला. सामाजिक वनीकरण विभाग, वडगाव मावळचे अधिकारी चंदनशिवे यांचे शाळेला वेळोवेळी मार्गदर्शन मिळते. त्यातून पर्यावरण विषयक उपक्रम राबविण्यात येतात. संस्थेचे अध्यक्ष सुरेश झेंड, पदाधिकारी अनंत भोपळे, दिलीप कुलकर्णी, प्रमोद देशक, विश्वास देशपांडे, सुचित्रा चौधरी, ज्योती चोळकर आदींनी सर्वांचे अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.