Pimpri : अरुण पवार यांचा वारकरी संप्रदायाच्या वतीने गौरव

एमपीसी न्यूज –  श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्यामध्ये पालखी तळावर कीर्तन, भजन, जागर करणाऱ्या वारकऱ्यांना मोफत पाण्याचे टँकर, तंबू, भजन आदी साहित्य देऊन सेवा केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते अरुण पवार यांचा वारकरी संप्रदायाच्या वतीने खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते पांडुरंगाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. तसेच हभप रामहरी कस्पटे यांनी ३६ वर्ष पांडुरंगाच्या मंदिरामध्ये विण्याची सेवा केल्याबद्दल नागरी सत्कार करण्यात आला. 

यावेळी हभप ज्ञानेश्वर महाराज कदम आळंदी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे अध्यक्ष हभप मारुती कोकाटे, शांताराम महाराज निम्हण, मृदुन्गाचार्य पांडुरंग अप्पा दातार, हभप बाळासाहेब जाधव, हभप वसंत कलाटे, नगरसेवक राहुल कलाटे, नगरसेवक मयुर कलाटे आदी उपस्थित होते.

अरुण पवार हे गेली अनेक वर्षे वारकरी संप्रदायाची सेवा करीत आले आहेत. श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्या दरम्यान पालखी तळावर कीर्तन, भजन, जागर करणाऱ्या वारकऱ्यांना मोफत पाण्याचा टँकर, तसेच तंबू व भजन साहित्य देतात. भंडारा डोंगर येथे दोन वर्ष वृक्षलागवड करून व त्याचे बाराही महिने संगोपन करून झाडे जतन करण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यांनी आजपर्यंत पिंपरी-चिंचवड शहरात लावलेली रोपे, तसेच महापालिकेकडून लावण्यात आलेल्या रोपांना देखील मोफत पाणी पुरवठा करतात. अनावश्यक खर्च टाळून वारकरी संप्रदायातील भजनी मंडळींना, तसेच ज्येष्ठ नागरिकांना भेट म्हणून रोपे व भजनी साहित्य भेट म्हणून देण्यात येते. या सर्व सेवेबद्दल त्यांचा वारकरी संप्रदायाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.