Nigdi News: ‘गौरी – गणपती सजावट’ ऑनलाईन स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 13 च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘घरचा गणपती व गौरी सजावट ऑनलाइन स्पर्धा 2021’ या स्पर्धेतील विजेत्यांना क्रीडा सभापती प्रा. उत्तम केंदळे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

समाजात निम्मी संख्या असलेल्या महिला भगिनींच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी गौरी-गणपती गृह सजावटसारख्या विविध स्पर्धा व उपक्रम सातत्याने राबविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचा विश्वास नगरसेवक केंदळे यांनी यावेळी व्यक्त केला.

स्पर्धेतील गणपती सजावटीमध्ये प्रथम पारितोषिक नयना प्रमोद पारखे, सचिन काळे, द्वितीय पारितोषिक अक्षय वासुदेव सौंदणकर,प्राची दिलीप भांडवकर, तर तृतीय पारितोषिक तुषार नामदेव साळुंके,सुदेश दुंदळे यांना देण्यात आले आहेच.

गौरी सजावट स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक वनिता पडवळ, माधुरी कदम, द्वितीय पारितोषिक सपना कदम , स्वाती देशपांडे  आणि तृतीय पारितोषिक प्राजक्ता निफाडकर, स्वप्नाली देवचके यांना नगरसेवक केंदळे यांच्या हस्ते देण्यात आले.

गोळवकर गुरुजी स्केटिंग रिंग ठाकरे मैदान, यमुनानगर या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे गजानन ढमाले, सुभाष सराफ, भाजपा प्रज्ञावंत आघाडी अध्यक्ष दीपक कुलकर्णी, भाजपा अध्यक्ष रंगनाथ पवार, बाबा परब, अनिल वाणी, चंद्रकांत शेडगे, विमल काळभोर, भगवान श्राद्धे, गिरीश देशमुख, आदित्य कुलकर्णी, प्राजक्ता निफाडकर उमेश घोडेकर, श्रीकांत सुतार, विशाल केंदळे, पंकज कोळी, प्रभू बालचंद्रण,स्वप्नील लोंढे, रुपल माने, प्रशांत बाराथे, कौस्तुभ देशपांडे प्रशांत तरटे, आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.