Pimpri : खासदार बारणे यांना आघाडी मिळवून दिल्याबद्दल गौतम चाबुकस्वार यांचा सत्कार

एमपीसी न्यूज – पिंपरी विधानसभेतून  खासदार श्रीरंग बारणे यांना 41 हजारची आघाडी दिल्याबद्दल पिंपरी-चिंचवड शहर शिवसेना व युवासेना पिंपरी विधानसभा यांच्या तर्फे आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी शहर प्रमुख योगेश बाबर, पिंपरी शहर संघटक रोमी संधु, पिंपरी विधानसभा युवती सेनाधिकारी प्रतिक्षा घुले, विभाग संघटक निलेश हाके, उपविभाग संघटक सनी कड उपस्थित होते.

‘तब्बल 19 दिवस पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे संपूर्ण पिंपरी मतदारसंघ आपण पालथा घातला. यावेळी लोकांच्या प्रतिक्रिया, उत्साह, पाहून शंभर टक्के बारणे हे खासदारपदी पुन्हा निवडून येतील, असा विश्वास आपणास आला होता व कमीतकमी 25 ते 30 हजारांचा लीड पिंपरीतून असेल व एक लाखापेक्षा अधिक मते बारणेंना मिळतील अशी  प्रतिक्रिया व्यक्त केली होती. मात्र, पिंपरीतील मतदारांनी माझ्या कष्टाचे व केलेल्या आवाहनाचे चीज करून 41 हजारांपेक्षा जास्त मतांची आघाडी पिंपरीतून बारणेंना मिळवून दिली.

वंचितच्या उमेदवाराला पिंपरीतून 20 हजाराच्या पुढे मते मिळाली असली तरी त्यांनी अजून मते मिळवायची होती. जेणेकरून बारणेंना अधिक लीड मिळाला असता,’ असे कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी नमूद केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.