Gautam Pashankar Missing Case : बेपत्ता गौतम पाषाणकर सापडले गुलाबी शहरात; ओळख लपविण्यासाठी केला दूरवर प्रवास

_MPC_DIR_MPU_IV

एमपीसीन्यूज : पुण्यातील पाषाणकर ऑटोचे संचालक आणि उद्योजक गौतम पाषाणकर यांचा शोध घेण्यात पुणे पोलिसांना अखेर यश आले आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना जयपूर येथून ताब्यात घेतले. पाषाणकर यांनी कुटुंब आणि पोलिसांपासून ओळख लपविण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी त्यांनी रेल्वेतून पुणे, कोल्हापूर, बंगळुरु, कोईम्बतूर, कोलकाता, दिल्ली, जयपूर असा लांबचा प्रवास केला.

बेपत्ता झाल्यानंतर पाषाणकर पुण्यातील सेंट्रल बिल्डिंग परिसरातील एका ठिकाणाहून नारळ पाणी घेताना दिसून आले होते. गुन्हे शाखेच्या पथकाकडून त्यांचा शोध सुरू होता. काही दिवसांनी पाषाणकर कोल्हापूर शहरात दिसून आले होते. एका हॉटेलमध्ये ते राहिल्याचे सीसीटीव्ही पोलिसांना मिळाले होते.

ओळख पटल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकांनी कोल्हापूर येथे धाव घेत तपास केला. पाषाणकर हे कोकणात गेले असावे, अशी शक्यता गृहीत धरून गुन्हे शाखेची पथके कोकणात रवाना झाली होती.

दरम्यान, त्यांचा शोध घेतला जात असताना पाषाणकर आज, मंगळवारी गुलाबी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयपूर येथे मिळून आले आहेत.

गुन्हे शाखेच्या पथकाने अतिशय कौशलपुर्ण तपास करुन त्यांचा शोध घेतला. त्यांच्या गायब होण्याचे ठोस कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. त्याबाबत चौकशी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.