Pimpri : गौतमी पाटीलच्या अश्लिल नृत्यावर राज्यात बंदी घालावी, प्रदिप नाईक यांची मागणी

एमपीसी न्यूज : गौतमी पाटील च्या अश्लिल नृत्यावर (Pimpri) महाराष्ट्रात बंदी घालावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे कार्यकारीणी सदस्य प्रदिप नाईक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, लावणी हि महाराष्ट्राची लोककला आहे. या कलेत कधीही अश्लिलता दिसली नाही. मात्र गौतमी पाटील ने तमाशाच्या नावाखाली कलेला ही लाजवले आहे. नृत्यातून केले जाणारे अश्लिल हावभाव तरुण पिढीला वेगळ्याच वळणावर नेत आहेत. तमाशा लावणी याची परंपरा व गौतमी पाटील यांचे नृत्य यांच्यात खूप तफावत आहे. त्यांचे नृत्य कमी अश्लिलता जास्त पहायला मिळते. या अशा नृत्यांमुळे लावणीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलत आहे.

Pimpri : किवळे दुर्घटनेतील नागरिकांना महापौर निधीतून मदत करा – अजित गव्हाणे

गौतमी पाटील हि देखील महाराष्ट्राची कन्या आहे. तिला असे नृत्य शोभत नाही. तिच्या कलेला नाही तर तिच्या अश्लिल हावभावांना सारे विरोध करत आहेत. (Pimpri) याने महाराष्ट्राची संस्कृती बिघडत आहे. पुरुषांच्या नजरा वाईट म्हणून पुरुषांना सतत सुनावले जाते मात्र महिलांना असे नृत्य करायला मुभा आहे का? समाज व कायदे देखील पुरुषांच्या विरोधात आहे अशा परिस्थीत गौतमी सारख्या मुलींना कोण अडवणार. त्यामुळे महाराष्ट्राच्या लोककलेची बदनामी थांबवावी व गौतमी पाटीलच्या अश्लिल नृत्यावर त्वरीत राज्यात बंदी घालावी, अन्यथा काद्यानुसार कारवाई करण्याचा ईशारा प्रदिप नाईक यांनी निवेदनातून दिला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.