Akurdi : गावडे कन्स्ट्रक्शन ग्रुप तर्फे आयोजित शिबिरात १५२ जणांनी केले रक्तदान

एमपीसी न्यूज – आकुर्डी येथील गावडे कन्स्ट्रक्शन ग्रुपच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात १५२ जणांनी रक्तदान केले. तसेच १०० जणांनी इच्छुक अवयवदात्यांनी प्रतिज्ञापत्र भरुन सामाजिक कार्यात सहभाग नोंदविला.

आकुर्डी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान शिबिर भरविण्यात आले होते. या उपक्रमाचे हे सातवे वर्ष असून देशभक्तांपर्यंत रक्तदान आणि अवयवदान या उपक्रमांची माहिती पोचल्याने याबाबत समाजात जनजागृती झाली. हे शिबिर पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील रक्तपेढीच्या सहकार्याने घेण्यात आले. तसेच या शिबिराला जीवनविद्या मिशन मुंबई यांचेही सहकार्य लाभले आहे.

या शिबिराचे संयोजन हरिश्चंद्र काळभोर. शंकर नरवडेस संदेश तनपुरे, महेश ढोले, विराज गावडे, निखिल काळभोर, मोहित गावडे, मनोहर मोडक, संतोष मराठे, गौतम कांबळे, आशा कांडेकर, किरण बुक्के, दिलीप पाटील, निखिल वाघोले, शहाजी कांबळे, बबलु शिंगारे आदींनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.