Gawarwadi: जीवे मारण्याची धमकी देत तरुणाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज –   विनाकारण जिवे मारण्याची धमकी देत तरुणाला बेदम (Gawarwadi)मारहाण करण्यात आली. ही घटना 11 एप्रिल रोजी गवारवाडी माण येथे घडली.

सचिन तानाजी राजपूत (वय 30, रा. घोटावडे फाटा, पौड) आणि त्याच्या तीन ते (Gawarwadi)चार साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अक्षय प्रभुलाल नट (वय 25, रा. गवारवाडी, माण) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

CHAKAN : ओव्हरटेक करताना ट्रकची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हातामध्ये लाकडी दांडके घेऊन गवारवाडी येथे आले. त्यांनी दहशत पसरविल्याने सर्व लोक पळून गेले. त्यानंतर आरोपी सचिन राजपूत याने फिर्यादी यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी यांचा भाऊ आणि बहीण आले असता त्यांना देखील आरोपींनी मारहाण केली. ‘मी सांगेन तसे तुम्ही वागले नाही तर मी मारून टाकीन’ अशी आरोपींनी धमकी दिली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.