Pimpri News: कोरम अभावी सर्वसाधारण सभा तहकूब

तिस-यावेळी सभा तहकूब 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर कोरम अभावी सर्वसाधारण सभा तहकूब करण्याची नामुष्की ओढाविली. भाजपचे नगरसेवक सभागृहात नव्हते. सभेचा कोरम पूर्ण होत नव्हता. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याची तहकूब सभा आज (मंगळवारी) पुन्हा तहकूब केली आहे. फेब्रुवारीची सभा तब्बल तिस-यावेळी तहकूब केल्याने सत्ताधा-यांना सभा कामकाजाचे काही गांभीर्य आहे की नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

फेब्रुवारी महिन्याची 18 तारखेला नियोजित सभा होती. याच सभेत स्थायी समितीच्या रिक्त होणाऱ्या आठ जागांसाठी प्रत्येक पक्षाच्या कोट्यानुसार सदस्य निवड होणार होती. अपक्ष गटाचा सदस्य निवडण्यावरु सर्वसाधारण सभेत राडा झाला होता. त्यामुळे सर्वसाधारण सभा 22 फेब्रुवारीपर्यंत तहकूब करण्यात आली होती.

त्यानंतर 22 फेब्रुवारीला तहकूब सभा दुपारी दोन वाजता होती. त्यात ‘भाजप हटाव, पीसीएमसी बचाव’चा नारा राष्ट्रवादीचे नगरसेवक देणार होते. या आशयाचे ॲप्रण घालून ते सभागृहाकडे निघाले. याची कुणकूण भाजपला लागली आणि  महापौर उषा ढोरे यांनी विरोधक सभागृहात येण्यापूर्वीच कोरमअभावी सभा तहकूब केली.

Pimpri news: ‘अतिरिक्त आयुक्त पवार, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रॉय यांचे सर्व अधिकार काढा’

 

त्यानंतर आज मंगळवारी (दि.9) तहकूब सभेला दुपारी दोन वाजता सुरुवात झाली. ऑक्सीजन पुरवठा, स्पर्श हॉस्पिटलला दिलेले बीले यावर नगरसेवकांनी तब्बल पाच तास चर्चा केली. त्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले.

आयुक्तांचा खुलासा, महापौरांचा आदेश झाल्यानंतर शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी कोरमचा मुद्दा उपस्थित केला. सभा कामकाज चालविण्यासाठीचे सदस्य सभागृहात नाहीत. त्यामुळे सभा तहकूब करावी, अशी सूचना मांडली. त्याला भाजपच्या मोरेश्वर शेंडगे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर महापौर ढोरे यांनी आजची सभा 18 मार्च दुपारी दीड वाजेपर्यंत तहकूब केली. फेब्रुवारी महिन्याची सभा तब्बल तीनवेळा तहकूब केली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.