Pune News : जनरल मोटर्स इंडियाने तळेगाव प्लांटमधील 1419 कामगारांना दिली ले-ऑफची नोटीस

एमपीसी न्यूज : पुण्यामध्ये जनरल मोटर्स इंडियाने तब्बल 1419 कामगारांना ले-ऑफची नोटीस बजावल्याने वाद निर्माण झाला आहे.  औद्योगिक विवाद कायदाच्या कलम 25 अन्वये ही कारवाई केली आहे. या निर्णयाला आता कामगार युनियन कायदेशीर आव्हान देणार असल्याचे समजते.

इकॉनॉमिक्स टाइम्स माहितीनुसार, पुण्यातील जनरल मोटर्सने एक ईमेल पाठवून तळेगाव दाभाडे प्रकल्पातील सर्व 1419 कामगारांना ले-ऑफ नोटीस पाठवण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

त्याची प्रत जनरल मोटर्स कर्मचारी युनियन सचिव आणि अध्यक्षांनाही दिली गेली आहे. तर कर्मचाऱ्यांना नियमानुसार नुकसान भरपाई दिली जाईल. त्यांना मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या 50 टक्के भरपाईही दिली जाणार असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. तसेच, कंपनीने मागील, 4 महिन्यात एकही वाहन तयार केलं नाही. तरीही कर्मचाऱ्यांना वेतन दिलं. आम्ही कर्मचाऱ्यांना आवश्यकतेपेक्षा अधिक सेपरेशन पॅकेजची ऑफर दिली आहे, असे कंपनीने म्हटले आहे.

या दरम्यान, तळेगाव प्रकल्पातील उत्पादन 24 डिसेंबर 2020 पासून बंद केलं होतं. तर कंपनीने उत्पादन बंद करण्याबाबत कर्मचाऱ्यांना एक वर्ष अगोदरच याबाबत माहिती देण्यात आली होती. तर पुन्हा उत्पादन सुरु कऱण्याची शक्यता नसल्याचंही सांगण्यात आलं. मागील 4 महिन्यांपासून उत्पादन काहीच नसताना सुद्धा कर्मचाऱ्यांना वेतनापोटी दहा कोटी महिन्याला खर्च केला असल्याचं कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.