Pune : आनंद विद्यानिकेतन हायस्कूलमध्ये भूगोल दिन व पानिपत शौर्य दिन उत्साहात 

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय भूगोल दिन व पानिपत शौर्य दिनाचे औचित्य साधून विमाननगर येथील आनंद विद्यानिकेतन हायस्कूलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी भूगोलाशी निगडीत विविध माॅडेल तयार करून त्यांचे प्रदर्शन भरविले. यामध्ये सूर्यग्रहण, सूर्यमाला, ऋतू चक्र जागतिक तापमानवाढ, ज्वालामुखी याविषयावर प्रकल्प सादर केले. यासाठी भूगोल विषय शिक्षिका उज्वला पाटील यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. संतोष थोरात सरांनी भूगोल दिनाची माहिती, जागतिक तापमानवाढ, धोका व पानिपताच्या शौर्य गाथेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना छान माहिती सांगितली. वाडेकर सरांनी नकाशा वाचन व मोजमाप याविषयावर प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे शेवटी भूगोल शिक्षक म्हेत्रे सरांनी भौगोलिक प्रश्न मंजुषेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये भूगोल विषयाची जागृती व आवड निर्माण केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत गोरोबा शिक्षण संस्थेच्या कार्यवाह किरण तावरे या होत्या. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात भूगोल दिन व ईतर दिन साजरे करण्याचे प्रयोजन याविषयी मार्गदर्शन केले. तसेच उत्कृष्ठ आयोजन व नियोजनाबाबत सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. विद्यालयातील सर्व शिक्षकांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.