Germany : जर्मनीतील ‘सोशल डिस्टंसिन्ग’ दैनंदिन जीवनातील एक संस्कृती !

एमपीसी न्यूजचे जर्मनीतील वाचक जीवन करपे यांचे अनुभव

एमपीसी न्यूज – सोशल डिस्टंसिग म्हणजे नक्की काय? यामध्ये खूप वेगवेगळे विचार पुढे येत आहेत. याबाबत एमपीसी न्यूजचे जर्मनीतील वाचक जीवन करपे म्हणाले, गेली अनेक वर्ष मी युरोपमध्ये राहत आहे. युरोप मधील 10 देश ऑफिसच्या कामानिम्मित फिरलेलो आहे. एक गोष्ट नक्की कि जर्मनी आणि इतर युरोप यांच्यामध्ये खूप मोठा फरक प्रकर्षाने जाणवला. जर्मनीमध्ये सोशल डिस्टंसिन्ग हा एक कल्चर किंवा दैनंदिन जीवनातील एक संस्कृती आहे.

या बाबत अधिक माहिती देताना करपे म्हणाले,  जर्मनीचा भू भाग हा महाराष्ट्र पेक्षा थोडासा मोठा आहे. जर्मनीमध्ये लहान मोठी अशी जवळ जवळ 100 पेक्षा जास्त शहरे आहेत. प्रमुख 4 शहरे सोडली तर बाकी सर्व शहरांची लोकसंख्या 7 लाखांच्या आत आहे. विशेष म्हणजे सर्व शहरांमध्ये उद्योगधंदे त्यामूळे खूप ’कॉन्सन्ट्रेटेड पॉपुलशन’ नाही. मिग्रेशनचे प्रमाण फार कमी आहे. जर्मनीमध्ये सोशल डिस्टंसिन्ग हा एक कल्चर किंवा दैनंदिन जीवनातील एक संस्कृती आहे.

सिग्नलवर लोक एक दुसर्‍यापासून दूर दूर थांबतात. शॉपिंग मॉलमध्ये देखील एकमेकांपासून अंतर ठेवतात. सुपर मार्केटमध्ये जाताना आणि बाहेर येताना दरवाजे ऑटोमॅटिक आहेत. जर्मनीमधील घरांमधील अंतर देखील बरेच आहे. इतर देशांसारखी मल्टीस्टोरी अपार्टमेंट्स जर्मनीमध्ये फार बघायला मिळत नाही.

जर्मनीमध्ये जवळ जवळ 30 टक्के लोक हे एकटे राहतात. त्यांना जिंगल्स असे म्हणतात. सुपर मार्केटमध्ये किंवा बर्‍याच कंपन्यांमध्ये हॅन्ड सॅनिटायझरचा वापर हे एक नॉर्मल रुटीन आहे. सगळ्या शहरांमध्ये मुलांना खेळण्यासाठी गार्डन्स आहेत. बस, ट्रेनमध्ये गर्दी हा प्रकार नाहीच. सोशल डिस्टंसिन्गचे उत्तम उदाहरण म्हणजे जर्मनी ! बहुदा याकडे कोणाचेच लक्ष अजून तरी गेले नाही. आज जर्मन ’स्टँडर्ड जर्मन स्टँडर्ड’चा जो बोलबाला जगामध्ये चालू आहे, त्यामध्ये या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. जर्मनीच्या तुलनेत इतर देश हे काही प्रमाणात टुरिस्ट स्पॉट आहेत. त्यामुळे सोशल डिस्टंसिन्गला तिलांजली दिली गेली आहे.

इटली. फ्रान्स, स्पेन, नेदरलँड्स, स्वित्झर्लंड हे सर्व टुरिस्ट स्पॉट्स आहेत. इथे थोड्याफार प्रमाणात सोशल डिस्टंसिन्गला बाजूला ठेवले जाते. जर्मनी हा टुरिस्ट स्पॉट नसून उद्योगांचा देश आहे. इतर देशांच्या तुलनेत जर्मनीमध्ये कुटुंबात फार लोक नाहीत. घरातील मुले ही वयाच्या 22-23 मध्ये आई वडीलांपासून दूर राहतात. जर्मनीत निसर्गावर प्रेम करणारे, युवा पिढीला स्वावलंबी करणारे नागरिक आहेत.

जर्मनीचा व्हिसा मिळवण्यासाठी तुम्हाला कमीत कमी माणसी 12 चौरस मीटर अंतर ठेवणे हा नियम आहे. प्रत्येक माणसाला त्याची स्वतंत्र जागेची व्यवस्था करून ठेवली आहे. कार्यालयामध्येही देखील सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टंसिन्ग कल्चर फार पूर्वीपासून अस्तित्वात आहे. जर्मनीतील कार्यालयामध्ये मिटींग या skype च्या माध्यमातून होतात. थेट संपर्क फार कमी होतो.

भारतीयांनी सोशल डिस्टंसिन्गचा धडा जर्मनीकडून घ्यावा

भारतातील सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी युरोप आणि इतर प्रगत देश फार पूर्वी पाहिलेत. मग आपल्या देशातील वाढत्या शहरीकरणाकडे का दुर्लक्ष केले ? असे मॉडेल का नाही वापरले. जर संसदेमध्ये अनेक वर्ष काम केले असेल तर आपण या टाऊन प्लांनिंगच्या माध्यमातून एकाच राज्यामध्ये अनेक शहरे विकसित का नाही केलीत, हा एक मोठा प्रश्न आहे. जपान आणि जर्मनी दुसर्‍या महायुद्धामध्ये पूर्णपणे उद्वस्त झाले होते. त्याचवेळी भारताला देखील स्वातंत्र्य मिळाले. तेव्हापासून आजपर्यंत सगळ्या गोष्टी सोईस्कररित्या बाजूला ठेवल्या गेल्या. परंतू, अजूनही वेळ गेली नाही. पुण्यातील आयटी इंडस्ट्री जळगाव, भुसावळ, नांदेड, सोलापूर या कमी गर्दी असलेल्या शहरात शिफ्ट करा आणि सोशल डिस्टंसिन्गचा धडा जर्मनीकडून घ्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.