Akurdi : लॉकडाऊनमध्ये घरबसल्या प्रमाणपत्रे मिळवा; अप्पर पिंपरी चिंचवड तहसील कार्यालयाचा उपक्रम

Get Home Certificates in Lockdown; Upper Pimpri Chinchwad Tehsil Office Initiative

एमपीसीन्यूज : दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकालानंतर विविध प्रकारचे दाखले घेण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन तसेच करोनाच्या पार्श्वभूमीवर अप्पर तहसिलदार पिंपरी चिंचवड कार्यालयाने विद्यार्थांना आवश्यक असणारे दाखले घरबसल्या ऑनलाईन मिळण्याची व्यवस्था केली आहे. त्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी तसेच नागरिकांनी ‘आपले सरकार’ या वेबसाईटवर माहिती आणि कागदपत्रे सादर करावीत, त्यानंतर त्यांच्या ई-मेल आयडीवर डिजिटल स्वक्षरीयुक्त दाखले देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

अप्पर पिंपरी चिंचवड तहसीलदार गीता गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे. विद्यार्थांनी प्रामुख्याने उत्पन्नाचे प्रमाणपत्र, वय,अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र , आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र काढण्यासाठी तहसिल कार्यालय, महा ई सेवा केंद्र येथे मोठ्या प्रमाणात गर्दी करण्याची गरज नाही.

करोनाच्या पार्श्वभूमीवर अप्पर तहसिलदार पिंपरी चिंचवड कार्यालयाने हे दाखले घरबसल्या ऑनलाईन मिळण्याची व्यवस्था केली आहे. नागरिकांनी ‘आपले सरकार’ (https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en ) या वेबसाईटवर माहिती आणि कागदपत्रे सादर केल्यानंतर त्यांच्या ई-मेल आयडीवर डिजिटल स्वक्षरीयुक्त दाखले मिळणार आहेत.

पुणे जिल्ह्यात प्रथमच अप्पर तहसिलदार पिंपरी चिंचवड कार्यालयामार्फत (https://apparpcmc2020.blogspot.com/2020/07/blog-post.html?m=1) ही वेबसाईट  तयार करण्यात आलेली आहे. या वेबसाईटवर कशाप्रकारे अर्ज दाखल करावा यासाठी VIDEO लिंक देण्यात आलेली आहे.

नागरिकांना प्रमाणपत्रासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी तसेच 39 महा ई सेवा केंद्र आणि नागरिक सुविधा केंद्र आकुर्डी यांचे मोबाईल क्रमांकही देण्यात आले आहेत.

नागरिकांना आपले सरकार या पोर्टलवर अर्ज भरण्यास अडचण येत असेल तर त्यांनी पिंपरी चिंचवड हद्दीतील 39  महा ई सेवा केंद्र आणि नागरिक सुविधा केंद्र आकुर्डी यांच्याशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे जमा करावीत, असे आवाहन तसीलदार गीता गायकवाड यांनी केले आहे.

या ठिकाणी भरा अर्ज
https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en
या वेबसाइटवर अर्ज भरता येणार आहेत. या वेबसाइटला तांत्रिक अडचण आल्यास पिंपरी चिंचवड तहसिलदार कार्यालयाच्या वेबसाईट ( https://apparpcmc2020.blogspot.com/2020/07/blog-post.html?m=1 ) वर जाऊन माहिती भरा. अधिक माहितीसाठी 020-27642233 संपर्क करा.

महत्वाच्या सूचना

अर्ज हा English and Marathi मध्येच भरावा. अर्ज भरत असताना काळजी पुर्वक इंग्रजी व मराठीमधील नाव बरोबर आहे किंवा नाही हे तपासूनच अर्ज Submit करावा. कागदपत्र पाठवताना व्यवस्थित मूळ कागदपत्रे स्कॅन करून पाठवणे.  काही अडचण असल्यास सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेस कार्यालयाशी संपर्क साधावा.

प्रमाणपत्रासाठी लागणारे कागदपत्रांची यादी

 उत्पन्नाचा दाखला :

* स्व:घोषणा पत्र ,* रेशन कार्ड, * आधार कार्ड, * लाईट बिल, * फोटो, * तलाठी उत्पन्नाचा दाखला आर्थिक वर्ष 2019-2020 किंवा वेतन प्रमाण पत्र (फॉर्म-16,  2020-21  ) ( आयकर विवरण पत्र 2020-21  )

वय, अधिवास आणि राष्ट्रीयत्व दाखला (डोमासाईल) : * स्व:घोषणा पत्र,  * स्वताचा शाळा सोडल्याचा दाखला /बोनाफाईड/जन्म दाखला, * वडीलांचा शाळा सोडल्याचा दाखला /जन्म दाखला, * रेशन कार्ड, * आधार कार्ड, * १० वर्षाचे लाईट बिल. *फोटो.

रहिवाशी दाखला : * स्व:घोषणा पत्र, * स्वतःचा शाळा सोडल्याचा दाखला,* वडीलांचा शाळा सोडल्याचा दाखला, * रेशन कार्ड, * आधार कार्ड, * 15 वर्षाचे लाईट बिल / टॅक्स पावती, * फोटो,

जातीचा दाखला : * स्व:घोषणा पत्र, * स्वतःचा शाळा सोडल्याचा दाखला, * वडीलांचा शाळा सोडल्याचा दाखला,* वडीलांचा जातीचा दाखला, * इतर रक्ताचे नाते संबंधातील नातेवाईकांचे जातीचे दाखले किंवा शाळा सोडल्याचे दाखले, * रेशनकार्ड, * आधार कार्ड, * लाईट बिल किंवा टॅक्स पावती, * फोटो.

*पिंपरी चिंचवड शहरातील जात नमूद पुरावा .{ इतर मागास वर्ग (OBC) आणि सामाजिक आर्थिक मागास प्रवर्गासाठी (SEBC) 1967  पूर्वीचा , भटक्या विमुक्त जातीसाठी (NT) 1961  पूर्वीचा , अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी (SC AND ST) 1950 पूर्वीचा }

नॉन क्रिमिलिअर/ उन्नत व प्रगत गटात मोडत नसलेबाबतचा दाखला : * स्व:घोषणा पत्र, * स्वतःचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड, * स्वतःचा जातीचा दाखला, * वडीलांचा शाळा सोडल्याचा दाखला व जातीचा दाखला, * रेशनकार्ड, * आधार कार्ड, * लाईट बिल किंवा टॅक्स पावती, * फोटो, *3 वर्षाचा उत्पन्न दाखला किंवा फॉर्म 16.

जेष्ठ नागरीकत्वाचा : * स्व:घोषणा पत्र, * स्वतःचा शाळा सोडल्याचा दाखला,* वैद्यकिय प्रमाणपत्र, * रेशन कार्ड, * आधार कार्ड / मतदान ओळखपत्र, * लाईट बिल / टॅक्स पावती, * फोटो,

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी प्रमाणपत्र : * स्व:घोषणा , * स्वतःचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड, * वडीलांचा शाळा सोडल्याचा दाखला, * रेशनकार्ड, * आधार कार्ड, * लाईट बिल किंवा टॅक्स पावती, * 3  वर्षाचा उत्पन्न दाखला प्रमाणपत्र, * 1967 पासून महाराष्ट्रातील वास्तव्याचे पुरावे * फोटो

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.