Ghatkopar Incident : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला उदयपूरमधून अटक

भावेश भिंडे याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडे याला  मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. राजस्थानच्या उदयपूरमधून भावेशच्या मुसक्या आवळण्यात मुंबई पोलिसांना यश आले(Ghatkopar Incident) आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी आहे की,सोसाट्याच्या वारा आणि मुसळधार पावसामुळे घाटकोपर येथील बेकायदेशीरपणे उभारलेले होर्डिंग दि.(13 मे) रोजी एका पेट्रोल पंपावर पडले. त्या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला असून 75  लोक जखमी झालेले आहेत. हे होर्डिंग इगो मीडिया कंपनीने बेकायदेशीरपणे उभे केले होते. इगो मीडिया कंपनी ही भावेश भिंडेच्या मालकीची असल्यामुळे तो या दुर्घटनेला कारणीभूत होता. घाटकोपर येथील होर्डिंग पडल्यानंतर भावेश भिंडे फरार झाला होता.

Mumbai : मुंबईत सोसाट्याच्या वारा आणि मुसळधार पावसाने घातला धुमाकूळ; होर्डिंग पेट्रोल पंपावर पडले

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घाटकोपर दुर्घटनेला कारणीभूत ठरलेल्या दोषींवर लवकरात लवकर कारवाई करावी असे स्पष्ट आदेश मुंबई पोलिसांना  दिले होते. त्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी 7 पथके तयार करून वेगवेगळ्या भागांत आरोपी भावेश भिंडेचा(Ghatkopar Incident)  शोध सुरु केला होता. भावेश भिंडेचे शेवटचे लोकेशन लोणावळ्यात आढळलं होतं. मात्र, आज पोलिसांनी भिंडेला राजस्थानमधून अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.