Ghorpadi : अडगळीच्या खोलीत नेऊन अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न; तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज-सार्वजनिक शौचालयात जात असताना एका (Ghorpadi ) अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने अडगळीच्या खोलीत नेऊन तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्याचा प्रयत्न तिघांनी केला. 14 वर्षाच्या मुलीने धाडसाने त्यांच्या तावडीतून सुटका करून घेत  प्रसंग टाळला आहे.

मुंढवा पोलिसांनी तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी समीर शेख (रा. पंचशीलनगर, घोरपडी), कार्तिक (रा. घोरपडी) आणि मुचा अशी गुन्हा दाखल झालेल्या या आरोपींची नावे आहेत. याबाबत 14 वर्षीय मुलीने तक्रार दिली आहे. हा प्रकार घोरपडी येथील पंचशीलनगर येथे सोमवारी मध्यरात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान घडला आहे.

Pune : भाऊसाहेब रंगारी शिवगर्जना मित्र मंडळातर्फे स्वच्छतेचे अभियान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी सार्वजनिक शौचालयामध्ये शौचाकरीता रात्री साडे बाराच्या सुमारास जात होती. त्यादरम्यान रेल्वे पटरीच्यामध्ये उभी राहून ती मोबाईल बघत होती. त्यावेळी तिघे जण आले. त्यांनी तिचा मोबाईल जबरदस्तीने घेतला. तिने मोबाईल परत मागितला.

तेव्हा त्यांनी  तिला मारहाण करुन जवळच्या अडगळीच्या खोलीत नेले. तेथे तिच्यावर जबरदस्ती करण्याचा  प्रयत्न केला. तेव्हा तिने त्याला विरोध करुन त्यांच्या तावडीतून सुटका करुन घेतली. पुढील तपास उपनिरीक्षक अश्विनी भोसले करीत (Ghorpadi ) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.