Pimpri News : घोरपडीचा साई सिल्वर संघ ठरला पिंपरी करंडक 2022 स्पर्धेचा मानकरी

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने घेण्यात आलेल्या पिंपरी करंडक 2022 दिवस रात्र टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा घोरपडीचा साई सिल्वर संघ मानकरी ठरला आहे. संघाला प्रथम क्रमांकाचे 1 लाख 11 हजार 111 रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले.

नवमहाराष्ट्र महाविद्यालय क्रीडांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. माजी खासदार अमर साबळे यांच्या शुभहस्ते व शिवसेना माजी गटनेते राहुल कलाटे, माजी नगरसेवक संदीप वाघेरे,डॉ.विनायक पाटील यांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस समारंभ पार पडला.

कै. सुमन बाळकृष्ण वाघेरे यांच्या स्मरणार्थ घेण्यात आलेल्या पिंपरी करंडक 2022 स्पर्धेमध्ये राज्यभरातील एकूण 64 संघांनी सहभाग घेतला होता. अत्यंत उत्साही वातावरणात हे सामने खेळवले गेले. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक कै.सुमन बाळकृष्ण वाघेरे यांच्या स्मरणार्थ 1 लाख 11 हजार 111 रुपये साई सिल्वर संघ, घोरपडी यांनी पटकाविले.

कै.सविता सुभाष वाघेरे यांच्या स्मरणार्थ द्वितीय क्रमांकाचे 50 हजार रुपयांचे पारितोषिक बारामती वॉरीअर्स क्रिकेट संघ, कै दत्तोबा हरिभाऊशेठ वाघेरे यांच्या स्मरणार्थ तृतीय क्रमांकाचे 25 हजाराचे पारितोषिक झुंजार क्रिकेट क्लब ,व कै.रंगुबाई निवृत्ती कुदळे यांच्या स्मरणार्थ चतुर्थ क्रमांकाचे 15 हजार रुपयांचे पारितोषिक गोकुळवाडा क्रिकेट क्लब यांना मिळाले.

तसेच 40 वर्षावरील स्पर्धेसाठी कै. योगेश पोपटराव वाघेरे यांच्या स्मरणार्थ प्रथम क्रमांकाचे 35 हजार रुपयांचे पारितोषिक सुजन क्रिकेट संघ उरण यांनी पटकावले, कै. अमोल हिरामण कुदळे व कै.सोमनाथ नंदुकुमार खराडे यांच्या स्मरणार्थ द्वितीय क्रमांकाचे 25 हजार रुपयांचे पारितोषिक निलेशदादा भिंताडे, पुणे यांना मिळाले.

या कार्यक्रमादरम्यान पिंपरी गावातील विशाल हरगुडे, आदेश नाणेकर, मंगेश नढे, अभिजित चव्हाण, जेष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर, विशाका बलकवडे, सुकन्या कांजवणे, डॉ. राहुलकुमार डोंबळे या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच कोरोना काळात उल्लेखनीय काम करणारे यशवंतराव चव्हाण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विनायक पाटील यांना युवामंचच्या वतीने 1,11, 111 रुपयांचा धनादेश देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी माजी आमदार गौतम चाबुकस्वार माजी महापौर उषा ढोरे,माजी महापौर योगेश बहल, माजी नगरसेवक संदीप कस्पटे, मोरेश्वर शेडगे ,जितेंद्र ननावरे,कुणाल लांडगे, सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, उपअभियंता राजेश जगताप, बन्सल साहेब, वस्ताद दत्तोबा नाणेकर, नथू शिंदे, प्रविण कुदळे, नंदू बलकवडे, शंकर रसाळ, संजय गायखे, रामभाऊ कुदळे, रंजनाताई जाधव आदी उपस्थित होते. संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने 21 ते 27 मे या दरम्यान आलेल्या स्पर्धेचे नियोजन राजेंद्र वाघेरे, संदीप नाणेकर, हरिष वाघेरे,किरण शिंदे,सचिन वाघेरे,आकाश चव्हाण,मयुर कचरे,मयुर बोडगे,विठ्ठल जाधव,राजेंद्र मांडगे,गणेश मंजाळ यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.