Ghotawade Grampanchayt : रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या टेम्पो चालकाकडून एक लाख रुपयांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज : घोटावडे ग्रामपंचायत ने रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या टेम्पो चालकावर कारवाई केली आहे. या बेशीस्त टेम्पो चालकावर कारवाई (Ghotawade Grampanchayt)करत त्याच्याकडून एक लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

याविषयी माहिती माहिती देताना, घोटावडे ग्रामपंचायत सदस्य राजाराम शेळके म्हणाले की, नागरिकांनी ग्रामपंचायतला कळवले की सोमवारी रात्री एका टेम्पो चालकाने टेम्पोतील कचरा गावातील मुख्य रस्त्यावर टाकलेला आहे. सकाळी सीसीटीव्ही च्या फुटेज मध्ये दिसले की घोटावडे- मान- हिंजवडी मुख्य रस्त्यावरील 2 किलोमीटर लांब पट्ट्यात बापूजी बुवा मंदिर ते हनुमान चौक दरम्यान प्रत्येकी 50 फुटाच्या अंतरावर कचऱ्याचे पोती टाकलेले होती.

सरपंच भाग्यश्री देवकर म्हणाल्या की, “मी, उपसरपंच संतोष गोडांबे, माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राजाभाऊ शेळके व ग्रामपंचायत सदस्य हनुमंत घोगरे यांनी सकाळी घटनास्थळाची पाहणी केली. आम्ही पाहिले की त्या पोत्यांमध्ये सडलेले अन्न होते.(Ghotawade Grampanchayt) सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावरती आम्ही टेम्पो चालकाचा शोध घेतला व त्याला शोधून आणले. सुरुवातीस त्याने कचरा फेकल्याचे नाकारले पण आम्ही त्याला सीसीटीव्ही फुटेज दाखवल्यानंतर त्याने त्याची चूक कबूल केली.

Khadki Potholes : खडकी येथील रस्त्यांवरील खड्डे 8 दिवसात नं बुजवल्यास मनसेचा मेट्रो विरोधात आंदोलनाचा इशारा

सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी व ग्रामसेवक सी के देवकांबळे यांनी मिळून निर्णय घेतला की, त्या टेम्पो चालकाकडून एक लाख रुपये दंड वसूल करायचा आहे.(Ghotawade Grampanchayat) त्यानिसार टेम्पा चालकावर कारवाई करत दंड वसूल करण्यात आला. त्या टेम्पो चालकाने पूर्ण पिकअप ट्रक भरून असलेला कचरा रस्त्यावर टाकल्याने आम्ही त्याच्याकडून एवढा मोठा दंड वसूल केला आहे.” त्या म्हणाल्या, “यापुढे कोणीही असे कृत्य करू नये यासाठी आम्ही दंड वसूल करत आहोत. ग्रामपंचायतच्या वतीने घंटागाडी मधून दररोज घरोघरचा ओला व सुका कचरा गोळा करण्यात येत आहे. ग्रामपंचायत पूर्ण गाव स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. नागरिकांनी देखील ग्रामपंचायतला पूर्ण गाव स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करावी.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.