Maval : जिल्हा परिषद शाळांना आयटी कंपनीकडून 140 संगणक भेट

एमपीसी न्युज – मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांसाठी सिनेक्रॉन टेक्नॉलॉजीस या कंपनीकडून 140 संगणक संच भेट देण्यात आले. आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम राबविण्यात आला असून संगणक प्रदान समारंभ गुरुवारी (दि.1) वडगाव येथे संपन्न झाला. याचा प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांना मोठ्ठा फायदा होणार आहे.

यावेळी सिनेक्रॉन टेक्नॉलॉजीसचे असो.डायरेक्टर रफिक नदाफ, कायदेशीर सल्लागार सैफन मुजावर, सीनियर डायरेक्टर उमेश भापकर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष गणेश खांडगे,नगराध्यक्ष मयूर ढोरे, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे, युवक जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, युवक तालुकाध्यक्ष किशोर सातकर, संजय गांधी समिती अध्यक्ष नारायणराव ठाकर,राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा दिपाली गराडे,माजी सरपंच जिजाताई आगळे,पुष्पाताई घोजगे,साते सरपंच आरती आगळमे, उपसरपंच आम्रपाली मोरे,मुकुंद तनपुरे,डॉ.विकास कुडे,नितीन जाधव,रशिदा नदाफ तसेच मावळ तालुक्यातील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,शिक्षक, विद्यार्थी व पदाधिकारी उपस्थित होते.

PCMC: अतिरिक्त आयुक्तपदाचा वाद चिघळला; जांभळेंची तक्रार अन् झगडे यांना नोटीस

हिंजवडी आयटी पार्क मधील सिनेक्रॉन टेक्नॉलॉजीस या कंपनीने दिलेल्या नवीन संगणकांचा शाळेतील विद्यार्थ्यांना नक्कीच लाभ होणार आहे.विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञान घेताना संगणक हाताळता येणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची अधिक आवड निर्माण होण्यास मदत होईल.ग्रामीण भागात असणाऱ्या या शाळांमधील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे धडे गिरविण्यातील अडचणी यामुळे दुर झाल्या आहेत.जिल्हा परिषद शाळांना पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात संगणक मिळाल्याने शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.

आजचे युग आधुनिक तंत्रज्ञानाचे आहे.याकडे वाटचाल करीत असताना जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना देखील शालेय स्तरावर संगणकीय ज्ञान मिळाले पाहिजे.ही गरज ओळखून सिनेक्रॉन कंपनीने संगणक दिल्याने आमदार सुनील शेळके यांनी त्यांचे आभार मानले.

शाळेतील विद्यार्थ्यांची संगणकाची गरज पूर्ण करण्यासाठी खारीचा वाटा आम्ही उचलला आहे.संगणकीय शिक्षणातुन शालेय विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना उभारी देण्याचा आमचा मनोदय आहे असे सिनेक्रॉन टेक्नॉलॉजीसचे ॲडमिन मॅनेजर राजेश आगळे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.