Maval News : महिंद्रा कंपनीच्या वतीने स्नेहालय वृद्धाश्रमास किराणा साहित्य भेट

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील कान्हे येथील महिंद्रा सीआय ई कंपोजिट डिव्हिजन यांच्या वतीने इंदोरी येथील स्नेहालय संस्थेच्या वृद्धाश्रमास एक महिन्याचा किरणा माल भेट देण्यात आला. महिंद्रा कंपनीने दिलेल्या मदतीच्या हाताचे स्नेहालयाचे व्यवस्थापक जयसिंग हिरे यांनी आभार मानले.

कान्हे येथील महिंद्रा कंपनीच्या माध्यमातून इंदोरी येथील स्नेहालय संस्था वृध्दाश्रम चालवत आहे. त्या संस्थेस एक महिन्याचा किराणा भेट दिला.

सदर कार्यक्रमास महिंद्राचे एच आर मॅनेजर बाळासाहेब पाटील,सागर पवार, संदिप पानसरे, सौरभ जांभळे उपस्थित होते.

महिंद्रा सी आय ई कंपोजिट डिव्हिजन कान्हे यांच्या वतीने वृध्दाश्रमास किराणा भेट दिल्याबद्दल स्नेहालयाचे व्यवस्थापक जयसिंग हिरे सरांनी आभार व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.