PimpleSaudagar : पिंपळे सौदागर येथे दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ

एमपीसी न्यूज –  पिंपळे सौदागर येथे शत्रुघ्न (बापु) काटे युथ फाऊंडेशन, उन्नती सोशल फाऊंडेशन व जयनाथ शेठ काटे युथ फाऊंडेशन यांच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण, गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. 

पिंपळे सौदागर येथील बासुरी बॅंक्वेट हॉलमध्ये यावेळी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना जिम्मी पंडिता यांनी केले. यावेळी पवना सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष जयनाथ काटे, नगरसेवक शत्रुघ्न(बापु)काटे, उन्नति सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे,  संजय भिसे, नगरसेविका निर्मला कुटे, यशदा रियालिटी ग्रुपचे अध्यक्ष वसंत काटे, स्वीकृत नगरसेवक संदीप नखाते, स्वीकृत नगरसेवक गोपाळ माळेकर, विजय भिसे, भानुदास काटे-पाटील, विजय धनवटे, राजेंद्र जयस्वाल, रामप्रकाश वासन, कैलास काटे, विकास काटे, सतीश काटे, रमेश वाणी, भागवत झोपे, विलास नगरकर, अर्चना भालेराव, निलेश कुंजीर, प्रवीण कुंजीर, गणेश झिंजुर्डे, सुभाष भिसे, कमलेश काटे, काळुराम झिंजुर्डे, गिरीश रोहिडा, संदीप फुके, राज सोमवंशी, बाळासाहेब परघळे, गणेश अमराळे, विकास(भोला)काटे विविध शाळांतील विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.

तसेच दहावी व बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या मुलांना मोबाईल टॅब, घड्याळ, पेन, वही, स्कूल बॅग व इतर शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी  आपल्या प्रभागातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू देण्यात आले. तसेच कार्यक्रमाचे सूत्र संचालन सागर बिरारी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.