Girish Bapat : एकदा पराभव झाल्याने त्याच मतदारसंघात सलग पाच वेळा निवडून येणारे आमदार – गिरीश बापट

एमपीसी न्यूज : भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गिरीश बापट यांचे (Girish Bapat) आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात निधन झाले. त्यांचे वैकुंठ स्मशानभूमीत संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. गिरीश बापट यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून आणि नात असा परिवार आहे.

गिरीश बापटांचा जन्म3 सप्टेंबर 1950 साली झाला.त्यांचे प्राथमिक शिक्षण तळेगाव दाभाडे येथे तर माध्यमिक शिक्षण  न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथे झाले . त्यांनी बी. कॉम  बीएमसीसी महाविद्यालयातून केले होते.राजकीय जीवनात प्रवेश करण्यापूर्वी 1973 मध्ये गिरीश बापट टेल्को कंपनीत कामाला देखील होते. पुणे शहराच्या राजकीय वर्तुळात सर्व पक्षीय नेत्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे एक वेगळेच स्थान राहिले आहे.

 

नगरसेवक ते खासदारपदापर्यंत थक्क करणारा प्रवास राहिला आहे.आणीबाणीत नाशिक जेलमध्ये 19 महिन्यांचा कारावास देखील झाला होता.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि परिवारातील संस्थांमधील  विविध पदांची जबाबदारी त्यानी सांभाळली होती.

Girish Bapat : गिरीश बापट यांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं – चंद्रकांत पाटील

पुणे शहराच्या राजकीय वर्तुळात 1983 ते 2023 पर्यंत सक्रीय राहणारे गिरीश बापट तीन वेळा नगरसेवक, पाच वेळा आमदार आणि विद्यमान खासदार म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

Girish Bapat : भाजपला तिसरा मोठा धक्का, खासदार गिरीश बापट यांचे निधन; बालेकिल्ल्याचा किल्लेदार हरपला!

भाजपचे पुण्यामध्ये वर्चस्व वाढवण्यात गिरीश बापट यांचा मोलाचा सहभाग होता. कसबा पेठ विधानसभेच्या 1993 च्या पोटनिवडणुकीत (Girish Bapat) त्यांचा पराभव झाला. पण हा पराभव त्यांचे पुढचे यश ठरले. त्यानंतर त्यांनी राजकारणात मागे वळून पाहिले  नाही.

Pune : अखेरच्या श्वासापर्यंत लढणारा कार्यकर्ता – गिरीश बापट

1995 पासून कसबा पेठ मतदारसंघात सलग पाचवेळा ते आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर  अनेक खात्यांचे मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून त्यांची वर्णी लागली अखेर त्यांनी 2019 पासून पुण्याचे खासदार म्हणून कार्य केले. त्यांच्या जाण्याने भाजप पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.