Jammu, Kashmir: गिरीशचंद्र मुर्मू यांचा राजीनामा, मनोज सिन्हा नवे राज्यपाल

Girishchandra Murmu's resignation, Manoj Sinha new governor of J&K.

एमपीसी न्यूज – जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल गिरीशचंद्र मुर्मू यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला आहे. त्यांच्या जागी भाजप नेते, माजी रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांची आज (गुरुवारी) नियुक्ती केली आहे.

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेतील 370 कलम रद्द केले आहे. त्याला 5 ऑगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यादिवशी मुर्मू यांनी पदाचा राजीनामा दिला होता. राष्ट्रपतींनी तो राजीनामा स्वीकारला आहे.

राष्ट्रपतींनी जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल म्हणून मनोज सिन्हा यांची नियुक्ती केली आहे. सिन्हा यांची ही नियुक्ती गिरीशचंद्र मुर्मू यांच्याकडून अधिकार ग्रहण केलेल्या दिवसापासून असेल.

कोण आहेत मनोज सिन्हा?

मनोज सिन्हा 2014 मध्ये उत्तरप्रदेशच्या गाजीपूर लोकसभा मतदारसंघातून संसदेवर निवडून आले होते. एनडीए एकच्या सरकारमध्ये रेल्वे राज्यमंत्री म्हणून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम केले.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. तेव्हापासून सक्रिय राजकारणापासून ते लांब होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.