Pune: पुणे जिल्हा हादरला ! चारित्र्याच्या संशयावरून विवाहित प्रेयसीची गळा चिरून हत्या

Girlfriend murdered by married man in Shirur.

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार घडला. चारित्र्याच्या संशयावरून विवाहित प्रियकराने विवाहित प्रेयसीची गळा चिरून हत्या केली.

ही घटना आज रविवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास शिरूर तालुक्यातील एका गावात घडली.

सारिका सुदाम गिरमकर (वय 30) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. दत्तात्रय गेनूभाऊ गायकवाड असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. शिरूर पोलिसांनी त्याला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मयत हे वाडाकॉलनी गावात भाड्याच्या घरात राहत होते.

दोघांचेही लग्न झाले असून दोघेही पती-पत्नीपासून वेगळे झाले होते. मागील काही वर्षांपासून ते या गावात पती पत्नीप्रमाणे राहत होते.

दरम्यान आरोपी दत्तात्रय हा वारंवार सारिका हिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. यावरून दोघांमध्ये भांडणे होत.

रविवारी रात्री त्यांच्यात याच कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. हा वाद इतका विकोपाला गेला की दत्तात्रय गायकवाड यांनी सारिका गिरमकर हिचा चाकूने गळा कापून खून केला.

त्यानंतर स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. शिरूर पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक खानापूरे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.