Pimpri : जयवंत माध्यमिक विद्यालयात ‘बालिका दिन व जलसाक्षरता जनजागृती अभियान 

एमपीसी न्यूज – भोईरनगर येथील जयवंत माध्यमिक विद्यालयात शुक्रवारी (दि.3) सावित्रीबाई फुले यांच्या १८९ वी जयंती बालिका दिन म्हणून साजरी करण्यात आली.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, प्रमुख पाहुणे म्हणून यशदाचे कार्यकारी संचालक सुमंत पांडे, जलप्रेमी प्रवीण मोरे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शिरूर शाखेच्या अध्यक्षा दिपाली शेळके, संस्थेच्या संचालिका किरण भोईर माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक अजय रावत, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका वंदना सावंत उपस्थित होत्या.

यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमाचे पूजन करून त्यांच्या सामाजिक शैक्षणिक कार्याची माहिती विद्यार्थांना सांगण्यात आली. यशदाचे सुमंत पांडे यांनी जल साक्षरता व जलसंवर्धन या विषयावर विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तर रूपाने संवाद साधला.

दीपाली शेळके यांनी जल साक्षरतेची सप्तपदी सांगितली. प्रवीण मोरे यांनी ‘थेंबे थेंबे तळे साचे’ याविषयी व्हिडिओ क्लिप दाखवून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊसाहेब भोईर यांनी केले. आभार मुख्याध्यापक अजय रावत यांनी केले. सूत्र संचलन धनराज गुटाळ यांनी केले. यावेळी राजेश पाटील,  भोळे हेमचंद्र, सुरेखा स्वामी व शिक्षेतर कर्मचारी व सर्व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.