Alandi News : प्रेमसंबंधातून ‘ते’ दोघे पळून गेले, मुलीच्या घरच्यांनी मुलाच्या घरी जाऊन तोड फोड करत जिवे मारण्याची दिली धमकी

एमपीसी न्यूज – प्रेमसंबंधातून मुलगा मुलगी पळून गेल्याच्या रागातून मुलीच्या घरच्यांनी मुलाच्या घरी जाऊन घरातील लोकांना मारहाण केली तसेच घरातील वस्तू, दारे, खिडक्या व चारचाकी गाडीच्या काचा फोडल्या. तुझे घर जेसीबीनेच पाडतो आणि तुमचे हातपाय तोडून भर चौकात लटकवतो अशी धमकी त्यांनी दिली. हि घटना शुक्रवारी (दि.11) रोजी कोयाळी या ठिकाणी घडली.

याप्रकरणी प्रेयसी सोबत पळून गेलेल्या मुलाच्या भावाने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुनिल नामदेव कोळपे (वय. 30, रा. कोयाळी, गणेश नगर, ता. खेड) असे त्यांचे नाव आहे.

_MPC_DIR_MPU_II

त्यानुसार पोलिसांनी विजय चोरामले (रा. चिंबळी, ता. खेड, पुणे) ऋषिकेश बापु कोळेकर, राजू हरिभाऊ नरूटे, बापु तात्याबा कोळेकर, धिरज हरिभाऊ नरुटे (सर्व रा. कोयाळी, जि. पुणे) प्रशांत मदने पुर्ण नाव माहीत नाही (रा. माळवाडी, ता.हवेली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ बापुराव कोळपे आणि आरोपी बापु तात्याबा कोळेकर यांच्या मुलीचे प्रेम संबंध होते. प्रेमसंबधातून ते दोघे पळून गेले. या गोष्टींचा राग आल्यावर मुलीच्या वडिलांनी इतर आरोपी यांच्या सोबत मुलाच्या घरी जाऊन त्यांच्या घरातील फिर्यादी यांची आई व पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व घरातील वस्तूंची तोडफोड केली. हातातील लोखंडी गज, कु-हाड याच्या सहाय्याने घराची दारे, खिडक्या व खुर्ची यांची तोडफोड केली घरासमोर असलेली चारचाकी व दुचाकी यांची तोडफोड केली.

तुझे घर जेसीबीनेच पाडतो आणि तुमचे हातपाय तोडून भर चौकात लटकवतो भविष्यात तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1