Bhosari Crime : मुलीच्या विनयभंगाचा जाब विचारणाऱ्या वडिलांना मारहाण

एमपीसी न्यूज – तिघांनी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. (Bhosari Crime) त्याचा जाब विचारण्यासाठी मुलीचे वडील गेले असता तिघांनी मुलीच्या वडिलांना मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 21) सकाळी गव्हाणे वस्ती भोसरी येथे घडली.

आदेश वाघमारे (वय 18, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) आणि त्याचे दोन अल्पवयीन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Crime news : बांधकामाच्या प्लास्टरचा राडारोडा पडला म्हणून शेजाऱ्याकडून कुटुंबाला मारहाण 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या गल्लीतील मुले फिर्यादींच्या मुलीला वारंवार त्रास देत असत. एकाने फिर्यादींच्या मुलीशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला.(Bhosari Crime) इतर दोघांनी तिला जाता येता पाहून अश्लील हावभाव करत तिचा विनयभंग केला. हा प्रकार फिर्यादींना समजला असता त्यांचे पती आरोपींना जाब विचारण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपींनी फिर्यादीच्या पतीला शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी व काठीने बेदम मारहाण केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.