Hinjawadi : हिंजवडी आणि वाकड परिसरातील बेवारस वाहनांची माहिती पोलिसांना द्या

हिंजवडी वाहतूक विभागाचे नागरिकांना आवाहन

एमपीसी न्यूज -रस्त्याच्या बाजूला कित्येक दिवसांपासून वाहने धूळखात पडलेली दिसतात. त्या वाहनांमुळे रस्ता अरुंद होतो, परिणामी वाहतूककोंडी होते. तसेच त्यामध्ये काही चोरीची देखील वाहने असण्याची शक्यता असते. यामुळे अशा हिंजवडी आणि वाकड परिसरातील बेवारस वाहनांविषयी हिंजवडी वाहतूक पोलिसांना माहिती द्या, असे आवाहन हिंजवडी वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

नागरिकांनी व्हाट्स अपच्या माध्यमातून 8208706499 या क्रमांकावर संपर्क करावा. बेवारस वाहनांची माहिती देताना बेवारस वाहनांचे फोटो, रस्त्याचे नाव, अंदाजे किती दिवसांपासून वाहन रस्त्यावर उभे आहे, याबाबतची माहिती द्यावी, असे हिंजवडी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे यांनी सांगितले.

हिंजवडी वाहतूक विभागात येणारे रस्ते –
# कस्पटे चौक ते वाकड चौक
# मानकर चौक ते काळेवाडी फाटा चौक
# काळेवीडी फाटा चौक ते डांगे चौक
# डांगे चैक ते वाकडगाव चौक (दत्तमंदिर रोड)
# उत्कर्ष चौक ते छत्रपती शिवाजी चौक (वाकडगाव)
# डांगे चौक ते बिर्ला चौक
# थेरगाव फाटा ते तापकीर चौक
# डांगे चौक ते लंडन ब्रिज
# डांगे चौक ते भुमकर चौक
# चांदणी चौक ते किवळे ब्रिज (महामार्गाच्या दोन्ही बाजुस)
# भुमकर चौक ते शिवाजी चौक
# मारुंजी वाय जंन्शन ते लक्ष्मी चौक
# वाकड ब्रिज ते शिवाजी चौक
# हिंजवडी व मान आयटी परिसरामधील फेज 1, फेज 2, फेज 3 मधील रस्ते

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.