Pimpri news: पोलीस भरती मध्ये तृतीयपंथीयांना आरक्षण द्या व त्यासाठीच्या फॉर्ममध्ये तृतीयपंथीयांसाठी वेगळा कॉलम तयार करावा : निकिता मुख्यदल

एमपीसी न्युज : पोलीस भरती मध्ये तृतीयपंथीयांना आरक्षण द्या व त्यासाठीच्या फॉर्म मध्ये तृतीयपंथीयांसाठी वेगळा कॉलम तयार करावा अन्यथा मला मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयामध्ये आणि पोलीस ठाण्यामध्ये भीक मागण्याचे लायसन्स द्यावे, अशी मागणी निकिता मुख्यदल, हायकोर्ट व मॅट मधील याचिकाकर्त्या यांनी आज रविवार, 4 डिसेंबर रोजी पिंपरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.

मुख्यदल म्हणाल्या की, “मला मंत्रालयाच्या गेटवर थांबून प्रत्येक गाडी कडून 100 रुपयांची भीक मागण्याचे व प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये भी मागण्याचे लायसन्स द्यावे. जर मला कोणत्याही गाडी कडून 100 रुपयांची नाहीतर मी दुसऱ्या गाडीपुढे आडवी होऊन जीव देईन.”

राज्य सरकारने पोलीस भरती जाहीर केली आहे. राज्यभरात पुरुष व महिलांची सुमारे 18000 पदे भरली जाणार आहेत. पोलीस भरती प्रक्रियेसाठी 4 डिसेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत दिलेली आहे. मात्र पोलीस भरती प्रक्रिया जाहीर केल्यापासून तृतीय पद्यांना पोलीस भरती प्रक्रिया सामावून घ्यावे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक यांच्याकडे वारंवार मागणी निकिता मुख्यदल आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी केली आहे. परंतु मुख्यमंत्री यांनी आश्वासन देण्यापलीकडे काहीच केले नाही.

Talegaon Dabhade: पोलिसात तक्रार दिली म्हणून महिलेशी गैरवर्तन

पोलीस कर्मचारी भरती प्रक्रिया सुरू करताना अर्ज भरण्यासाठी पुरुष आणि स्त्री असे दोनच पर्याय घेण्यात आली असून तृतीयपंथीयांना अर्ज करण्यासाठी इतर हा पर्याय उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी अर्जदार निकिता मुख्यदल यांची आहे. याप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेत कंत्राटी पद्धतीवर सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या शहरातील तृतीयपंथीयांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु उच्च न्यायालयाने याचिका दाखल करून घेण्यापूर्वी महाराष्ट्र प्रशासकीय आयोग (मॅट) मध्ये जाऊन दाद मागण्याचे आदेश दिले होते.

त्यामुळे मुख्यादल यांनी दाद मागितली. त्यांच्या मागणीवरून सुनावणी घेताना मॅटच्या अध्यक्ष आणि माझी न्यायमूर्ती रुद्र भाटकर यांनी राज्य शासनाने 4 डिसेंबर पर्यंत अर्जात आवश्यक बदल करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र गृह विभागासह पोलीस महासंचालकांकडून पोलीस भरती प्रक्रियेच्या अर्जात कोणतेही बदल केलेले नाही. उलट त्यांनी आयोगाला याबाबत सरकारला धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल, असे सांगून वेळ काढून पणा केला जात आहे. राज्य सरकार आणि पोलीस महासंचालक हे तृतीयपंथीयांवर अन्याय करीत आहेत त्यांना पोलीस भरती प्रक्रिया सामावून घेण्यासाठी कुठलाही सकारात्मक प्रतिसाद देत नाहीत.

गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस कर्मचारी भरती प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे पण त्यामध्ये कुठेही तृतीयपंथीयांना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत उल्लेखही केलेल्या नसल्याने राज्यभरातील तृतीयपंथी नाराज झाले आहेत. त्यामुळे राज्य सरकार सह पोलीस भरती प्रक्रिया विरोधात आम्हाला उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल. वेळप्रसंगी या विसरून कोर्टापर्यंत जाऊ पण आम्ही संघर्ष करत राहू व न्याय मिळण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही मुख्यदल यांनी सांगितले आहे.

अजित गव्हाणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष म्हणाले की राज्यातील शिंदे फडणवीस सरकारनमुळे पोलीस भरती प्रक्रियेत तृतीयपंथीयांना सामावून घेण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. तृतीयपंथीयांना पोलीस भरती प्रक्रियेत सामान्य घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेस कडून आंदोलन करण्यात येईल. तृतीय पंथीयांना पोलीस भरतीत सामावून घेण्याच्या अर्जात अद्याप कोणताही बदल गृह विभागाने केलेला नाही. महाराष्ट्र प्रशासक आयोग (मॅट)ने राज्य सरकारला दिलेली मुदत आज डिसेंबर रोजी संपत असून आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन केले जात आहे. राज्य सरकार तृतीय पद्यांवर अन्याय करत असून सरकार विरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत असेही यावेळी गव्हाणे यांनी सांगितले.

तृतीया फाउंडेशनच्याच्या मंगलमूर्ती किन्नर चॅरिटेबल ट्रस्टच्या कादंबरी म्हणाल्या की, निवडणूक पूर्वी तृतीय पंथीयांना शोधून वोटर कार्ड दिले जाते तेव्हा त्यांना नागरिक म्हणून चालते. पण जेव्हा तृतीयपंथीयांना नोकरी देणे किंवा त्यांच्या उदरनिर्वाहासाठी पैसे देणे हा विषय येतोय तेव्हा सरकार काच कुच का करते?

कविता आल्हाट, शहराध्यक्ष, पिंपरी चिंचवड महिला राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवड शहरातील कार्यकर्ते या पत्रकार परिषदेस उपस्थित होते. तसेच तृतीया फाउंडेशनच्या च्या मंगलमूर्ती किन्नर चॅरिटेबल ट्रस्टच्या कादंबरी, रूपा लोटलीकर, फिरोज मुजावर व इतर तृतीयपंथीय कार्यकर्ते या पत्रकार परिषदेस उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.