Pune : पूरग्रस्तांना तातडीने मदत द्यावी; काँग्रेसची महापालिका आयुक्तांकडे मागणी

एमपीसी न्यूज – पूरग्रस्तांना तातडीने मदत द्यावी, जीवनावश्‍यक वस्तू तातडीने उपलब्ध करून द्याव्यात आणि अतिवृष्टीच्या पार्श्‍वभूमीवर अधिकची यंत्रणा नियुक्त करावी, अशी मागणी गुरूवारी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली. 
_MPC_DIR_MPU_II
या शिष्टमंडळात काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी यांचा समावेश होता.
घडलेली घटना दुर्दैवी आहे. प्रशासनाने पूरग्रस्तांना तातडीने अत्यावश्‍यक साहित्याची मदत उपलब्ध करून द्यावी. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने काँग्रेसने पूरग्रस्तांना नाष्टा, जेवणाची व्यवस्था केली आहे. परंतू आणखी मदतीची गरज असल्याने प्रशासनाने प्रयत्न करावेत, असे शिंदे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.