Pune News : तुम्ही मागाल ते देऊ, पण ‘डुग्गू’ला सोडा; अपहरण झालेल्या चिमुरड्याच्या वडिलांची भावनिक पोस्ट

एमपीसी न्यूज : पुढच्या बालेवाडी परिसरातून चार दिवसांपूर्वी स्वर्णव चव्हाण उर्फ डुग्गू’ या चार वर्षाच्या मुलाचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केले. अद्यापही त्याचा शोध लागला नाही. पोलीस अधिक असून या प्रकरणाचा तपास करत आहे. परंतु चार दिवसानंतर ही या चिमुरड्याचा ठावठिकाणा लागू शकला नाही. सोशल मीडियावर ही मोठ्या प्रमाणात या चिमुरड्याच्या अपहरणाच्या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. दरम्यान या मुलाचे वडील सतीश चव्हाण यांनी देखील फेसबुकवर एक भावनिक पोस्ट करत आपल्या मुलाला सोडण्याचे आवाहन केले. 

सतीश चव्हाण यांनी आपल्या फेसबुक वर एक पोस्ट करून, माझा मुलगा डुग्गू’बद्दल कुठलीही माहिती नाही. मला तो सापडला काही विचारायला कृपया फोन करू नका. तुमच्याकडे कुठलीही माहिती असेल तर प्लीज फोन करा. ज्या कोणी त्याला नेले, मला माझा मुलगा परत द्या.फक्त एकदा फोन करा, तुम्ही मागाल ते आम्ही देऊ. प्लीज आम्हाला फोन करा अशी विनवणी सतीश चव्हाण यांनी फेसबुक वरून केली आहे.

दरम्यान भाजपचे आमदार महेश लांडगे यांनीही दोन दिवसांपूर्वी डुग्गू’चा फोटो शेअर करून त्याच्या बद्दल काही माहिती असल्यास कुटुंबीयांकडे संपर्क करण्याचे आवाहन केलं होतं. याशिवाय सीसीटीवी फुटेज मध्ये आढळणाऱ्या दुचाकीचे दोन फोटोही शेअर करण्यात आले होते. काळ्या रंगाची दुचाकी चालवणारा व्यक्तींने त्याच अपहरण केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसही स्वर्णमचा कसून शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.