Pimpri: स्वाईन फ्ल्यूच्या लसची टंचाई; स्वाईन फ्ल्यूने घेतला वर्षात 13 जणांचा बळी 

महापालिका करणार 'ऑस्लेटॅमिविअर' कॅप्सूलची खरेदी

एमपीसी न्यूज – हवेतील गारव्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात ‘स्वाईन फ्लू’चा प्रार्दुभाव वाढत असून आजपर्यंत स्वाईन फ्ल्यूने वर्षात13 जणांचा बळी घेतला आहे. महापालिकेच्या दवाखान्यासह खासगी औषधांच्या दुकानांमध्ये  स्वाईन फ्ल्यूच्या लसची टंचाई निर्माण झाली आहे. दरम्यान, महापालिका स्वाईन फ्ल्यूसाठी आवश्यकतेनुसार 50 हजार ‘ऑस्लेटॅमिविअर’ कॅप्सूलची खरेदी करणार असून त्यासाठी येणा-या 18 लाख 95 हजार रुपये खर्चास स्थायी समिच्या सभेत आयत्यावेळी मान्यता दिली. 

हवेतील गारव्यामुळे स्वाइन फ्लूचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महाराष्ट्र राज्यात स्वाइन फ्लूची लागण होऊन मृत्यू होण्याचे सर्वाधिक प्रमाण पुणे जिल्ह्यात आहे. पिंपरी-चिंचवड शहराज आजपर्यंत स्वाईन फ्ल्यूने 13 जणांचा बळी घेतला आहे. आज बुधवारी एकाच दिवशी दोघांचा मृत्यू झाला आहे. वातावरणातील बदलामुळे स्वाईन फ्ल्युच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.

महापालिकेच्या रुग्णालयांसह खासगी औषधांच्या दुकानांमध्ये  स्वाईन फ्ल्यूच्या लसची टंचाई निर्माण झाली आहे. अनेक खासगी औषधांच्या दुकानांमध्ये स्वाईन फ्लयूची लस उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांना लस न घेता परत जाव लागत आहे. लस मिळत नसल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, ‘स्वाईन फ्लू’चा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे तातडीने  ‘ऑस्लेटॅमिविअर’ कॅप्सूलची खरेदी करण्यात येणार आहे. 50 हजार नग गोळ्या पालिका आवश्यकतेनुसार खरेदी करणार आहे. त्यासाठी येणा-या 18 लाख 19 हजार रुपये खर्चास स्थायी समिती सभेत आयत्यावेळी मान्यता दिली.
ही तातडीची बाब म्हणून थेट पद्धतीने गरजेनुसार औषध खरेदी होणार आहे.

महापालिकेचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय म्हणाले, महापालिकेच्या दवाखान्यात स्वाईन फ्ल्यूचे 70 डोस उपलब्ध आहेत. औषधांची मागणी केली असून ते दोन दिवसात उपलब्ध होतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.