Pune : ‘ग्लोबल कोकण फेस्टिव्हल ‘ मधील  प्रदर्शन दालनांचे   डॉ. राजेंद्रसिंह राणा यांच्या हस्ते  उद्घाटन

एमपीसी न्यूज – ‘ग्लोबल कोकण फेस्टिव्हल ‘ प्रदर्शन दालनांचे   डॉ. राजेंद्रसिंह राणा यांच्या हस्ते झाले. पुण्याच्या  महापौर मुक्ता टिळक उद्घाटन जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा, पुण्याचे महापौर मुक्ता टिळक , जर्मनीचे  ऑलिव्हर, मालदीव चे श्रीकांत, अमेरिकेचे ललीत महाडेश्वर, संयोजक संजय यादवराव, सहसंयोजक एम. क्यू. सय्यद, किशोर धारिया यांच्या हस्ते झाले.

या प्रदर्शनामध्ये खाद्यसंस्कृती,पर्यटन, बांधकाम, रोजगार, लोककला विषयक दालनांचा समावेश आहे. हा कार्यक्रम गुरुवारी सकाळी लक्ष्मी लॉन, मगरपट्टा सिटी,हडपसर येथे झाला.

‘कोकणाचा वारसा, नैसर्गिक साधनसंपत्ती जपत  शाश्वत विकास करण्यासाठी कोकणवासियांनी प्रयत्न करावेत.वाहून जाणारे पाणी अडवावे, जमिनीची धूप थांबवावी आणि मनुष्यबळ, बुद्धीचे विस्थापन रोखावे, त्यातून कोकणातील गावे  तीर्थक्षेत्रे व्हावीत ‘ अशी अपेक्षा जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, ‘ सर्वांच्या प्रयत्नातून कोकण हे पर्यटनाचे ग्लोबल हब झाले पाहिजे. त्यातून नव्या पिढीला पर्यटनाच्या संधी मिळतील. कोकणचे सौंदर्य देश – विदेशात पोहचवले पाहिजे.कोकणचा वारसा, दूर्ग, किल्ले जपण्यासाठी सर्वसामान्यांनी ही लक्ष दिले पाहिजे.

यावेळी वसईचे माजी महापौर राजीव पाटील, संजीवनी जोगळेकर,बाबा धुमाळ, तसेच पुण्यातील कोकणवासीयांच्या ३oo संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

गुरुवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ६ वाजता फेस्टिव्हल चे उद्घाटन आयोजित करण्यात आले आहे..

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.