NCP Agitation Against Governer : राज्यपाल चले जाव! पुण्यात काँग्रेस, राष्ट्रवादीचे राजभवनासमोर आंदोलन

एमपीसी न्यूज : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याविरोधात राज्यभरात संताप व्यक्त केला जातोय. त्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून राज्यपालांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राष्ट्रावादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

PCMC News: झगडे यांचा ‘एलबीटी’ विभाग जांभळे यांच्याकडून काढला

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आज बाणेरमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. त्याचवेळी पाषाण येथील अभिमान श्री सोसायटी जवळ राज्यपालांचा निषेध नोंदवण्यात आला. संभाजीराजे छत्रपती यांच्या संघटनेकडून काळे झेंडे दाखवण्यात आले. काँग्रेसच्याही काही पदाधिकाऱ्यांनी राजभवनसमोर आंदोलन करत कोश्यारी यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.