Goa CM: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना कोरोनाची लागण

माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून खबरदारी म्हणून मी काहीकाळ होम आयसोलेशनमध्ये राहणार आहे. मी घरातूनच काम करत माझे कर्तव्य बजावत राहीन.

एमपीसी न्यूज – भाजपच्या आणखी एका मुख्यमंत्र्याला कोरोनाची लागण आहे. गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना कोरोनाची लागण झाली आहे. ट्विटरवरून त्यांनी स्वतः याबद्दल माहिती दिली असून ते सध्या होम आयसोलेशनमध्ये आहेत. 

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ट्विटरवरून माहिती देताना असे म्हटले आहे की, ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून खबरदारी म्हणून मी काहीकाळ होम आयसोलेशनमध्ये राहणार आहे. मी घरातूनच काम करत माझे कर्तव्य बजावत राहीन. माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी चाचणी करून घ्यावी’ असे आवाहन त्यांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.