Goa Chikhal Kalo: गोव्यातला “चिखल कालो”उत्सव पारंपारिक पध्दतीने साजरा

एमपीसी न्यूज:( प्रमोद यादव) आषाढी एकादशीच्या दोन दिवसानंतर दक्षिण गोव्यातील माशेल गावात पारंपारिक “चिखल कालो” उत्सव साजरा केला जातो.(Goa Chikhal Kalo) “चिखल कालो” म्हणजे अक्षरशः चिखलात लोळणं असे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. स्त्री-पुरूष, अबाल-वृद्ध सर्वजण या पारंपारिक खेळात हिरहिरिने भाग घेतात.

 

उत्सव सुरू व्हायच्या अगोदरच्या रात्री सर्वजण माशेल येथील प्रसिद्ध देवकी कृष्ण मंदिरात एकत्र येतात, तिथे दुस-या दिवशी खेळ सुरू होई पर्यंत रात्रभर देवाची पुजा केली जाते. भजन, आरती असा तो पारंपारिक पुजापाठ असतो. सकाळी उपस्थित सर्वांना प्रसाद वाटप केल्यानंतर चिखलातील खेळाला सुरूवात होते.

 

 

 

 

अंगाला तेल लावून सर्वजण मंदीरासमोर जमा होतात, आणि खेळाला सुरूवात होते. भात लागणीला आपण शेतात जसा चिखल करतो, तशी मैदानातील त्या चिखलाची अवस्था केली जाते. मग, अंधळी कोंशिबीर, पाठशिवणी, चक्र मेंडराणी तसेच, कुत्ता हड्डी असे खेळ खेळले जातात.
सोबतीला पारंपारिक ढोल-ताशा यांची साथ असते. (Goa Chikhal Kalo) विशेष म्हणजे वय किंवा स्त्री-पुरूष असा कुठलाही भेदभाव यावेळी केला जात नाही. सर्वांच्या तोंडी जय विठ्ठल! हरी विठ्ठल! असा अखंड जयघोष ऐकायला मिळतो. महाराष्ट्रातील पंढरपूरला जाणारी वारी आपण पाहतो, रिंगण, फुगडी, गळाभेट आपण अनुभवली, पाहिली आहे. तशीच काहीसी गोव्यातील ही प्रथा. शेवटी सगळ्यांच साध्य एकच, विठ्ठल! विठ्ठल!

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.